Advertisement

अखेर 'या' कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी मिळाली


अखेर 'या' कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी मिळाली
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील काहीच कर्मचाऱ्यांसाठी सुरु करण्यात आली होती. यावेळी बँक, वकील व पत्रकार यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली नव्हती. मात्र आता या उपनगरीय लोकलमधून वकिलांनाही प्रवास करू देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी रेल्वे प्रशासनाला दिले.

उच्च न्यायालयातील सुनावणीसाठी हजर होणाऱ्या वकिलांपुरती ही परवानगी मर्यादित असून १८ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर अशा १४ दिवसांसाठी प्रायोगिक तत्त्वावर ती देण्यात आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास कनिष्ठ न्यायालयातील वकिलांनाही लोकल प्रवासाची परवानगी देण्याचा विचार केला जाईल, असेही मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने नमूद केले.

लोकलमध्ये गर्दी होणार नाही, अशी व्यवस्था केली गेली तरच वकिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात येईल, असे राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी आणि रेल्वे प्रशासनातर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी न्यायालयाला सांगितले. त्यांचे म्हणणे मान्य करत प्रत्यक्ष सुनावणीसाठी हजर होणाऱ्या वकिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

उच्च न्यायालय प्रशासनाकडून प्रत्यक्ष सुनावणीसाठी हजर होणाऱ्या वकिलांना प्रमाणित केले जाणार असून, त्यांनाच सुनावणीच्या दिवशी लोकल प्रवासासाठी रेल्वे प्रशासनाकडून पास वा तिकीट उपलब्ध केले जाणार असल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा