Advertisement

द्रुतगती मार्गानंतर जुन्या पुणे मुंबई महामार्गाचा टोल 18 टक्क्यांनी वाढला

1 एप्रिल 2023 पासून नवे दर लागू होणार असल्यानं प्रवाशांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे.

द्रुतगती मार्गानंतर जुन्या पुणे मुंबई महामार्गाचा टोल 18 टक्क्यांनी वाढला
SHARES

पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांना (Pune mumbai old highway) आता डबल झटका बसलाय. कारण पुणे मुंबई द्रुतगती प्रमाणेच आता जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील टोल मध्ये तब्बल 18 टक्क्यांने वाढ होणार आहे. 1 एप्रिल 2023 पासून नवे दर लागू होणार असल्यानं प्रवाशांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे.

याच मार्गावरील सोमटणे टोल नाका बंद करावा, या मागणीसाठी आमरण उपोषण तर 14 मार्चला मावळवासीय रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी स्वतः आंदोलनस्थळी येत यावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं होतं. पण उलट 1 एप्रिल 2023 पासून या टोलमध्ये आणखी वाढ करण्यात आली. त्यामुळे आता मुंबई-पुणे जुन्या मार्गावरील प्रवासासाठीदेखील जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे.

वाहन जुनेनवे
कार135156
हलके वाहन240277
ट्रक / बस476551
अवजड वाहन10231184


स्थानिकांसाठी

वाहन 
जुने
नवे
कार
4147
हलके वाहन
7283
ट्रक / बस
143165
अवजड वाहन
307355


दुसरीकडे पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील टोल महागल्यानं जुन्या पुणे मुंबई माहामार्गाने प्रवास करण्याच्या विचारात असणाऱ्या प्रवाशाना हा डबल झटका बसला आहे.



हेही वाचा

1 एप्रिलपासून मुंब्रा बायपास रोड बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

1 एप्रिलपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवास महागणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा