Advertisement

ओला, उबर टॅक्सीचालक- मालकांचा संप 21 मार्चपर्यँत स्थगित


ओला, उबर टॅक्सीचालक- मालकांचा संप 21 मार्चपर्यँत स्थगित
SHARES

मुंबई - ओला, उबर टॅक्सी चालक-मालकांनी अखेर मंगळवारी संध्याकाळी संप तात्पुरता मागे घेतला आहे. 21 मार्चपर्यंत संप मागे घेण्यात आल्याचे संघटनांनी जाहीर केल्याने आता बुधवारपासून ओला, उबर नियमित धावतील अशी माहिती टॅक्सीचालक के. के. तिवारी यांनी दिली आहे.‌ मंगळवारी टॅक्सी चालक-मालक आझाद मैदानावर धडकले. यावेळी टॅक्सी चालक-मालकांची फसवणूक करणाऱ्या ओला, उबर या खासगी कंपन्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान मंगळवारी मोठ्या संख्येने टॅक्सी बंद होत्या. त्याचा फटका प्रवाशांना बसला.

‌आपल्या मागण्याचे निवेदन सरकारकडे सादर केल्यानंतर संध्याकाळी संघटनांनी संप मागे घेतला. 21 मार्चपर्यंत या प्रश्नी तोडगा निघाला नाही तर 21 मार्चला पुढचा निर्णय घेण्यात येईल असेही तिवारी यांनी सांगितले आहे.

संपाचा ग्राहकांना फटका

ओला, उबर कंपन्यांकडून होत असलेल्या फसवणुकीविरोधात ओला, उबर टॅक्सीचालक-मालकांनी आक्रमक पवित्रा घेत संपाचे हत्यार उपसले होते. त्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून मोठ्या संख्येने गाड्या रस्त्यावर उतरल्याच नाहीत. त्यामुळे मंगळवारी ओला, उबरचा सरजार्च थेट 2.2. झाल्याची माहिती संघर्ष टँक्सीचालक-मालक संघाचे उपाध्यक्ष सय्यद जुनैद यांनी दिली. याचा फटका ग्राहकांना सहन करावा लागला. 500 रुपयांच्या भाड्याऐवजी ग्राहकांना थेट 1200 रुपये मोजावे लागले. त्यामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी होती.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा