Advertisement

सांताक्रूज बेस्ट बस डेपोमधील शेकडो कर्मचारी अचानक संपावर, दिवाळीत...

ऐन दिवाळीत प्रवाशांना या संपाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

सांताक्रूज बेस्ट बस डेपोमधील शेकडो कर्मचारी अचानक संपावर, दिवाळीत...
SHARES

मुंबईतल्या सांताक्रूझ बेस्ट बस डेपोमधील (Mumbai Santacruz Best Depot) शेकडो कंत्राटी बस कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. बोनस, पगारवाढ न झाल्याने तसंच इतर मागण्याही पूर्ण न झाल्याने कर्मचारी संपावर गेले आहे. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरुच राहणार असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांना या संपाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

सांताक्रूझ बेस्ट बस डेपो मधील शेकडो कंत्राटी बस कर्मचारी आज सकाळी अचानक संपावर गेले. आगर व्यवस्थापक सुरेश कलंत्रे म्हणाले, आम्ही कर्मचाऱ्यांना आव्हान केलं आहे. त्यांनी त्याचं जे म्हणण आहे ते द्यावं. मी व्यवस्थापनाकडे त्यांच्या मागण्या मांडणार आहे. त्यांचं निवेदन थोड्याच वेळात मिळेल. या अगोदर कधीही त्यांनी मागणी केली नव्हती. सकाळी केवळ चार बस बाहेर पडल्या. आता कर्मचाऱ्यांचे निवेदन आलं की, गाड्या सुरळीत होतील,

कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहेत?

1. दिवाळी बोनस देण्यात आलेला नाही

2. वाहकाचा पगार अठरा हजार पाचशे असून तो 12500 दिला जातो तर चालकाचा 23500 असून तो केवळ अठरा हजार दिला जातो त्यामुळे पगारात वाढ करण्यात यावी

3. बेस्टमध्ये काम करत असून देखील कामावर येण्यासाठी तिकीट काढावे लागते हा प्रवास मोफत करावा.



हेही वाचा

मुंबईतल्या 'या' सहा स्थानकांच्या प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर गगनाला भिडले

माथेरानची राणी पुन्हा रुळावर, नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सुरू

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा