Advertisement

माथेरानची राणी पुन्हा रुळावर, नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सुरू

अखेर तीन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सेवा सुरू झाली आहे. ही सेवा सुरु झाल्यामुळं प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

माथेरानची राणी पुन्हा रुळावर, नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सुरू
SHARES

तब्बल तीन वर्षानंतर आजपासून (22 ऑक्टोबर) नेरळ ते माथेरान अशी मिनी ट्रेनची (Neral-Matheran Mini Train) सेवा सुरू झाली आहे. आज सकाळी पहिली ट्रेन नेरळ स्थानकातून सुटली. सकाळी आठ वाजून 50 मिनिटांनी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनं प्रवासी (Passenger) उपस्थित होते. ही ट्रेन सकाळी 11.30 वाजता माथेरानला (Matheran) पोहोचणार आहे.

माथेरान ते नेरळ या मिनी ट्रेनची सर्वांना प्रतिक्षा होती. अखेर तीन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सेवा सुरू झाली आहे. ही सेवा सुरु झाल्यामुळं प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

माथेरान ते नेरळ ही मिनी ट्रेन सेवा नोव्हेंबरपर्यंत रुळावर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. अखेर ऑक्टोबरमध्येच ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

2019 मध्ये माथेरानमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं नेरळ ते माथेरान दरम्यानच्या डोंगर भागातील रेल्वे रुळांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळं गेल्या तीन वर्षांपासून नेरळ-माथेरान मार्ग बंद होता. तर अमन लॉज ते बाजारपेठ मार्गावर शटल रेल्वे सुरु होती. गेल्या अनेक दिवसापासून रुळ बदलण्याचं काम सुरु होतं. अखेर हे सर्व काम आता पूर्ण झालं आहे.

बंद असलेल्या मिनी ट्रेनमुळे पर्यंटकांचा हिरमोड होत होता. तर स्थानिकांनाही नेरळ ते माथेरान जाण्यासाठी अमन लॉजपर्यंत टॅक्सी आणि नंतर पायपीट करावी लागत होती. अखेर नोव्हेंबर 2020 पासून माथेरान ते अमन लॉज शटल सेवाच सुरु केली. मात्र नेरळ ते माथेरान अशी संपूर्ण मिनी ट्रेन सेवा बंदच ठेवण्यात आली होती.हेही वाचा

मुंबईत 'या' सहा स्थानकात १० रुपयांच्या फलाट तिकिटासाठी मोजावे लागणार ५० रुपये

मुंबईत 15 दिवसांसाठी जमावबंदी लागू, 'हे' आहेत निर्बंध

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा