Advertisement

एअर इंडियाच्या विमानात आढळलं वटवाघुळ, उडाला एकच गोंधळ

टेक ऑफच्या ३० मिनीटानंतर विमानातील बिझनेस क्लासमध्ये एक वटवाघुळ आढळले.

एअर इंडियाच्या विमानात आढळलं वटवाघुळ, उडाला एकच गोंधळ
SHARES

दिल्लीवरुन अमेरिकेला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात वटवाघुळ आढळल्याची घटना घडली आहे. एअर इंडियाची फ्लाइट नंबर AI-105 नं शुक्रवारी पहाटे २.२० वाजता दिल्लीवरुन अमेरिकेच्या न्यूजर्सीसाठी उड्डाण घेतले.

टेक ऑफच्या ३० मिनीटानंतर विमानातील बिझनेस क्लासमध्ये एक वटवाघुळ आढळले. यानंतर सकाळी ३.५५ वाजता विमानाची इमरजंसी लँडिंग झाली. वन विभागाच्या पथकानं विमानातील वटवाघुळाला बाहेर काढलं.

एअर इंडियाचे बोइंग 777-ER विमान दिल्ली-नवार्कसाठी वापरले जाते. एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, 'DEL-EWR AI-105 फ्लाइटसाठी दिल्ली विमानतळावर लोकल स्टँडबाय इमरजंसी घोषित केली होती. विमानाची लँडिंग झाल्यानंतर कॅबिन क्रुनं विमानात वटवाघुळ असल्याची माहिती दिली.'

शुक्रवारी उड्डाण घेतल्याच्या अर्ध्या तासानंतर वैमानिकानं एअर ट्रॅफिक कंट्रोलला विमानात वटवाघुळ असल्याची माहिती दिली. यानंतर विमानाची इमरजंसी लँडिंग करण्यात आली. लँडिंगनंतर विमानतळाच्या कर्मचाऱ्यांना विमानात वटवाघुळ आढळलं नाही. यानंतर वाइल्ड लाइफ एक्सपर्ट्सला बोलवण्यात आलं. त्यांनी विमानात फ्यूमिगेट (धुर) केला, यानंतर त्यांना मृतावस्थेत पडलेलं वटवाघुळ आढळलं.



हेही वाचा

Ulhasnagar : इमारतीचा स्लॅब कोसळला, ६ जणांचा मृत्यू

विमानात एकटा बसून दुबईत गेला तरुण, खरेदी केलं १८ हजाराचं तिकिट

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा