Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,09,215
Recovered:
47,07,980
Deaths:
79,552
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
37,656
1,657
Maharashtra
5,19,254
39,923

ऑक्टोबरपासून स्पाइसजेटची सर्व उड्डाणे सुरू


ऑक्टोबरपासून स्पाइसजेटची सर्व उड्डाणे सुरू
SHARES

आर्थिक समस्येत अडकलेली विमान कंपनी स्पाइसजेटने विमानांच्या उड्डाणात कपात केली होती. मात्र आता सर्व उड्डाणं अॉक्टोबरपासून पुन्हा सुरू होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल २ वरून स्पाइसजेटची विमानं उड़्ाणे करतील. १ ऑक्टोबरपासून या कंपनीचं मुंबई विमानतळावरील सर्व कामकाज टर्मिनल २ वर स्थलांतरीत करण्यात येणार असल्याचं कंपनीनं मंगळवारी सांगितलं. प्रवासी विमानांसह मालवाहू विमानही याचं टर्मिनलवरून रवाना होणार आहेत.

कंपनीचा खर्च कमी

एकाच टर्मिनलवर कंपनीचं कामकाज होणार असल्यानं कंपनीचा खर्च कमी होणार आहे, असं स्पाइसजेटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह यांनी सांगितलं. सध्यस्थितीत विमान कंपन्या विमानतळावरून दररोज १५० विमानांचं उड्डाण करते.  यामधील बहुतेक उड्डाण जुन्या १ बी टर्मिनसवरून होतं.  

७८ उड्डाणं

मागील ४ महिन्यात स्पाइसजेटनं ७८ उड्डाणं सुरु केली आहेत. यामध्ये मुंबईहून जम्मू, देहरादून, गुवाहाटी, जयपुर, अमृतसर, मंगळुरू, क्योम्बटूर याठिकाणी विमानसेवा सुरू केली आहे.हेही वाचा -

मुंबई विद्यापीठाला ‘ग्लोबल एज्युकेशन - २०१९’ पुरस्कार

पारले कंपनी मंदीच्या विळख्यात, १० हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाडRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा