Advertisement

मुंबई विद्यापीठाला ‘ग्लोबल एज्युकेशन - २०१९’ पुरस्कार

उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्याबद्दल मुंबई विद्यापीठाला राष्ट्रीय पातळीवरील ‘ग्लोबल एज्युकेशन पुरस्कार - २०१९’ प्राप्त झाला आहे.

मुंबई विद्यापीठाला ‘ग्लोबल एज्युकेशन - २०१९’ पुरस्कार
SHARES

उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्याबद्दल मुंबई विद्यापीठाला राष्ट्रीय पातळीवरील ‘ग्लोबल एज्युकेशन पुरस्कार - २०१९’ प्राप्त झाला आहे. राजस्थानातील उदयपूर येथे झालेल्या ग्लोबल एज्युकेटर फेस्टिव्हलमध्ये सोनम वायचुंग व लक्षराजसिंग मेवाड यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डिजिटल पेपर डिलिव्हरी

ओएसएम’बरोबरच मुंबई विद्यापीठाकडून सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका ‘डिजिटल पेपर डिलिव्हरी’मार्फत ८१९पेक्षा अधिक महाविद्यालयांना प्रश्नपत्रिका आॅनलाइन पाठविली जाते. प्रश्नपत्रिका छपाईचा, वाहतुकीचा खर्च व वेळ यातून वाचला जातो. तसंच, सुरक्षितरीत्या या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी महाविद्यालयाकडं पोहोचतात. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रत्येक प्रश्नपत्रिकेवर संबंधित महाविद्यालयाचं नाव छापलं जातं.  आॅनलाइन पुनर्मूल्यांकन, आॅनलाइन पीएच.डी प्रवेश परीक्षा, आॅनलाइन परीक्षा अर्ज, आॅनलाइन प्रवेश, आॅनलाइन संलग्नता अशा अनेक तंत्रज्ञानयुक्त सोईसुविधा मुंबई विद्यापीठानं केल्या आहेत. त्यामुळंहा पुरस्कार मुंबई विद्यापीठाला मिळाला आहे. 

पुरस्कारासाठी पात्र

मुंबई विद्यापीठानं २०१७ साली उन्हाळी सत्राच्या परीक्षांपासून सर्व परीक्षांसाठी संगणकाधारीत मूल्यांकन पद्धत म्हणजेच (आॅनस्क्रीन मार्किंग) सुरू केली. प्रत्येक परीक्षेला जवळपास १३ ते १६ लाख उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करून, त्याचं शिक्षकांमार्फत आॅनलाइन मूल्यांकन करून घेतलं. प्रत्येक सत्रातील ४५०पेक्षा अधिक परीक्षांच्या संपूर्ण मूल्यांकनाची प्रक्रिया ‘ओएसएम’ पद्धतीद्वार करणारे मुंबई विद्यापीठ हे भारतातील एकमेव विद्यापीठ असल्यानं या पुरस्कारासाठी पात्र ठरलं आहे.



हेही वाचा -

बेस्ट बस थांब्यासमोर थांबविण्यासाठी पिवळा स्टॉपर बॉक्स

विशेष फेरीतील प्रवेशाकडे २० हजार विद्यार्थ्यांची पाठ



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा