पारले कंपनी मंदीच्या विळख्यात, १० हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

पारले (parle agro) या नामांकीत कंपनीतील १० हजार कर्मचाऱ्यांच्या (employees) नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. तसं होऊ नये म्हणून प्रतिकिलो १०० रुपये किंवा त्यापेक्षा कमी किंमतीच्या बिस्किटांवरील जीएसटी घटवण्याची मागणी कंपनीकडून करण्यात आलीय.

SHARE

देशातलं मंदीचं सावट गहिरं होऊ लागलं आहे. एक एक करून त्याचे पडसाद बाजारात उमटायला लागले आहेत. याचं ताजं उदाहरण म्हणजे बिस्किटांची मागणी घटल्याने पारले (parle agro) या नामांकीत कंपनीतील १० हजार कर्मचाऱ्यांच्या (employees) नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. तसं होऊ नये म्हणून प्रतिकिलो १०० रुपये किंवा त्यापेक्षा कमी किंमतीच्या बिस्किटांवरील जीएसटी घटवण्याची मागणी कंपनीकडून करण्यात आल्याचं वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने दिलं आहे.    

बिस्किटांची मागणी घटली 

कंपनीतील सद्यस्थितीसंदर्भात पारलेचे कॅटेगरी हेड मयंक शहा म्हणाले की, "बिस्किटांची मागणी घटल्यामुळे कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. ग्राहक ५ रुपयांच्या बिस्किटाचं (parle g biscuit) पाकीट विकत घेण्यासाठीही विचार करत आहेत. त्यामुळे १०० रुपये प्रतिकिलो किंवा त्यापेक्षा कमी किंमतीच्या बिस्किटांवरील जीएसटी कमी करण्याची आमची मागणी आहे. कारण ५ रुपये किंवा त्यापेक्षा कमी किंमतीच्या पाकिटातून या बिस्किटांची विक्री होते. सरकारने आमची मागणी मान्य न केल्यास नाईलाजाने आम्हाला ८ ते १० हजार कर्मचाऱ्यांना हटवावं लागेल." 

जीएसटी कमी करा

कमी किंमतीची बिस्किटं आम्ही कमी नफ्यासह विकतो. मध्यम वर्ग आणि कमी आर्थिक उत्पन्न असणाऱ्या ग्राहकांना डोळ्यापुढं ठेऊन आम्ही अशी अनेक उत्पादनं तयार केली आहेत. परंतु या उत्पादनांवर अधिक जीएसटी (GST) आकारण्यात आल्याने मागणी घटली आहे. सरकारने ही मागणी पूर्ववत होण्यासाठी कर कमी करणं आवश्यक असल्याचंही शाह म्हणाले.हेही वाचा-

'अशी' करा जिओ फायबरच्या सुविधेसाठी नोंदणी

SBI च्या जुन्या होमलोनचेही व्याजदर घटणारसंबंधित विषय
ताज्या बातम्या