Advertisement

SBI च्या जुन्या होमलोनचेही व्याजदर घटणार

नव्या गृहकर्जधारकांसाठी गृहकर्जाचे व्याजदर घटवल्यानंतर स्टेट बँक आॅफ इंडिया लवकरच जुन्या गृहकर्जधारकांच्या व्याजदरांत देखील कपात करण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास जुन्या कर्जधारकांचा हप्ता (EMI) देखील कमी होऊ शकतो.

SBI च्या जुन्या होमलोनचेही व्याजदर घटणार
SHARES

नव्या गृहकर्जधारकांसाठी गृहकर्जाचे व्याजदर घटवल्यानंतर स्टेट बँक आॅफ इंडिया लवकरच जुन्या गृहकर्जधारकांच्या व्याजदरांत देखील कपात करण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास जुन्या कर्जधारकांचा हप्ता (EMI) देखील कमी होऊ शकतो. 

रिझर्व्ह बँके (RBI)ने द्विमासिक पतधोरण सादर करताना रेपो (Repo) आणि रिव्हर्स रेपो (Reverce repo rate) रेटमध्ये ०.३५ टक्क्यांची कपात केली होती. त्यानुसार एसबीआय (SBI)ने ०.१५ टक्क्यांची कपात केली होती.  

एसबीआयने जुलैमध्ये रेपो-लिंक्ड लेंडिंग रेटनुसार ग्राहकांना होमलोन देण्यास सुरुवात केली. त्यानुसार आरबीआयने व्याजदर घटवताच एसबीआयनेही व्याजदर कपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी गृहकर्जाचे व्याजदर कमी केले. 

व्याजदर कपातीचा लाभ नव्या ग्राहकांसोबत जुन्या कर्जधारकांनाही देता यावा, यासाठी एसबीआय सकारात्मकरित्या विचार करत आहे. सरकार अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नामुळे दुसऱ्या तिमाहीत ग्राहकांची मागणी वाढेल, असा विश्वास एसबीआयने व्यक्त केला आहे.

हेही वाचा-

एसबीआयकडून एनईएफटी, आरटीजीएस व्यवहारांवरील शुल्क रद्द

SBI ने केली मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा