Advertisement

SBI ने केली मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात

भारतीय स्टेट बँकेने (SBI) सोमवारी विविध मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात केली आहे. नवीन दर १ आॅगस्टपासून लागू होणार आहेत.

SBI ने केली मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात
SHARES

भारतीय स्टेट बँकेने (SBI) सोमवारी विविध मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात केली आहे. नवीन दर १ आॅगस्टपासून लागू होणार आहेत. रोकड अधिक झाल्याने आणि कर्जावरील व्याजदर (Interest Rate) घटल्याने ठेवींवरील व्याजदर घटवत असल्याचं एसबीआयने म्हटलं आहे.

एसबीआयने १७९ दिवसांच्या ठेवींवरील व्याजदरात ०.५ ते ०.७५ टक्के कपात केली आहे. तसंच दीर्घ मुदतीच्या ठेवींवर (Fixed Deposit) रिटेल विभागातील व्याजदर ०.२० टक्के आणि बल्क विभागातील व्याजदर ०.३५  टक्के कमी केले आहेत. याशिवाय बँकेने दोन कोटी रुपये आणि त्यावरील ठेवींवरील व्याजदरातसुद्धा कपात केली आहे.  

एसबीआय सध्या ७ ते ४५ दिवसांच्या ठेवींवर सामान्य नागरिकांना ५.७५ टक्के आणि वरिष्ठ नागरिकांना ६.२५ टक्के दराने व्याज देते. तर ५ ते १० वर्षांच्या मुदत ठेवींवर सामान्य नागरिक आणि वरिष्ठ नागरिकांना अनुक्रमे ६.६० टक्के आणि ७.१० टक्के दराने व्याज मिळते. एसबीआयने याआधी ९ मे ला ठेवींवरील व्याजदरांचा आढावा घेतला होता. हेही वाचा -

कर बचतीसह चांगला परतावा हवाय? 'या' आहेत पोस्टाच्या सर्वोत्तम योजना
जाणून घ्या कोणता प्राप्तिकर फॉर्म तुमच्यासाठी ठरेल योग्य


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा