Advertisement

'अशी' करा जिओ फायबरच्या सुविधेसाठी नोंदणी


'अशी' करा जिओ फायबरच्या सुविधेसाठी नोंदणी
SHARES

रिलायन्स उद्योगसमुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी काही दिवसांपूर्वी रिलायन्सच्या बहुप्रतिक्षीत जिओ फायबर सेवेची घोषणा केली. ५ सप्टेंबरला जिओचा तिसरा वर्धापनदिन असून, याच दिवशी जिओ फायबर लाँच करण्यात येणार आहे. यानंतर रिलायन्स जिओनं आपल्या नोंदणी प्रक्रियेचा तपशील जाहीर केला आहे. लॅंडलाईन फोन आणि टीव्ही सेट-टॉप बॉक्ससाठी जिओ फायबरची योजना दरमहा ७०० रुपयांपासून सुरू होणार असून, ती १० हजारपर्यंत असणार आहे. तसंच, प्रीमियम ग्राहकांना या सेवेसाठी १० हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

इंस्टॉलेशन मोफत

या सेवेच्या पहिल्या टप्प्यात ग्राहकांना इंस्टॉलेशन शुल्क आकारला जाणार नसून, याबाबत रिलायन्स जिओनं आपल्या संकेतस्थळावर माहिती दिली आहे. ग्राहकांकडून केवळ सेक्यूरिटी डिपॉजिट घेण्यात येणार आहे. तसंच, जिओनं वेलकम ऑफरची देखील घोषणा केली आहे. याअंतर्गत वार्षिक योजना खरेदी केल्यास ग्राहकांना मोफत HD किंवा 4K LED टीव्ही आणि 4K सेट-टॉप बॉक्स मिळणार आहे.  

अशी करा नोंदणी

 • jio Giga Fiber Registration संकेतस्थळावर जावं.
 • Jio Giga Fiber कनेक्शनसाठी आपला पत्ता टाकणं.
 • नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी टाकणं.
 • मोबाईलवर येणारा OTP संकेतस्थळावर टाकणं.
 • प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जिओच्या प्रतिनिधीकडून कॉल येईल. 

ओळखपत्राची गरज

या सुविधेसाठी ग्राहकांकडं ओळखपत्र असणं बंधनकारक आहे. आधार कार्ड अथवा कोणतंही  वोटर आईडी कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायविंग लायसन्स, यांसारख्य ओळखपत्रांची गरज आहे. दरम्यान, नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आणि जिओ फायबर सेवा उपलब्ध असल्यास एक इंस्टॉलेशन इंजीनिअर ब्रॉडबॅंड सिस्टीम बसविण्यात येईल. या इंस्टॉलेशननंतर २ तासांत सेवा सुरू होईल.

जिओफायबरची वैशिष्ट्ये:

 • जिओ फायबरचा स्पीड १०० एमबीपीएसपासून १ जीबीपीएसपर्यंत आहे.
 • प्रति महिना ७०० रु. ते १० हजार रुपयांचे प्लान्स असणार आहेत. 
 • जीओ गिगाफायबरवर केबल टीव्ही, व्हॉइस कॉलिंग आणि नवे सिनेमे पहता येणार आहेत. 
 • सिनेमा थिएटरमध्ये ज्या दिवशी प्रदर्शित होईल त्याच दिवशी तो पाहता येणार.
 • जिओची ही सिनेमाची फर्स्ट डे फर्स्ट शो  योजना २०२० च्या मध्यापासून सुरू होणार.
 • रिलायन्सने एमआर (MR) नावाचा डिव्हाइस आणला आहे. यामध्ये तुम्ही ऑनलाइन कपडे परिधान करू शकता.
 • जिओ गिगाफायबर या ब्राँडब्रँड सेवेत राऊटर, सेट टाॅप बाॅक्स आणि स्मार्ट होम सेवा मिळणार आहेत.
 • ब्राँडब्रँड सेवा इन्स्टाॅल करण्यास फक्त १ तासाचा वेळ लागणार आहे.
 • जीओ गिगा टीव्हीमार्फत ग्राहकांना व्हिडिओ काॅलिंगही करता येणार आहे. 
 • केबल टीव्हीसाठी जिओ सेट टाॅप बाँक्स लाँच.
 • जिओ गिगाफायबरद्वारे व्हिडीओ काॅन्फरन्सिंगही करता येणार.हेही वाचा -

दादा, पवार, नाना यांच्यावरही वाहतूक विभाग करणार कारवाई

मुंबई कॉंग्रेसची पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement