मुंबई काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत

पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मुंबई कॉंग्रेसकडून जीवनाश्यक वस्तूंनी भरलेला ट्रक पाठविण्यात आला आहे.

SHARE

पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मुंबई काँग्रेसकडून जीवनाश्यक वस्तूंनी भरलेला ट्रक पाठविण्यात आला आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा सोमवारी हिरवा झेंडा दाखवून हा ट्रक पूरग्रस्तांसाठी पाठविला. त्यावेळी  मिलिंद देवरा यांच्यासह कार्याध्यक्ष एकनाथ गायकवाड आणि मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहम्मद आरिफ नसीम खान यांसह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते.  

सर्वांनी मदत करावी

पूरग्रस्तांसाठी जीवनाश्यक वस्तू पाठविताना मिलिंद देवरा यांनी 'राजकारण बाजूला सारून सर्वांनी एकत्र येऊन मदत करण्याचं आवाहन केलं. सर्वांना एकत्र येऊन मदत केल्यास पूरग्रस्तांची लवकरात लवकर यातून सुटका होईल. कोल्हापूर आणि सांगली या भागातील नागरिकांवर जे संकट आलं आहे, याच दु:ख प्रत्येकालाच आहे. त्यामुळं तेथील नागरिकांसाठी जीवनाश्यक वस्तू, शालेय विद्यार्थ्यांसाठी कामी येणारी सामग्री आणि औषधं मुंबई काँग्रेसतर्फे पाठविण्यात आलं आहे', असं म्हटलं.  

अनेकांचा मृत्यू

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली या भागात आलेल्या महापुरामुळं आतापर्यंत तब्बल ६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्यची माहिती समोर येत आहे.हेही वाचा -

'आदित्य संवाद', 'जन आशीर्वाद यात्रा' यानंतर शिवसेनेचा 'हा' नवा उपक्रम

गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्ग वाहतूककोंडी होण्याची शक्यता कमीसंबंधित विषय
ताज्या बातम्या