Advertisement

'आदित्य संवाद', 'जन आशीर्वाद यात्रा' यानंतर शिवसेनेचा 'हा' नवा उपक्रम

पक्षीय राजकारणासाठी वेळ देणें शक्य नसलेल्या किंवा त्याबाबत अनुत्सुक असलेल्या विविध व्यावसायिकांना शिवसेनेशी जोडण्यासाठी ‘फ्रेंड्स ऑफ आदित्य ठाकरे’ नावाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

'आदित्य संवाद', 'जन आशीर्वाद यात्रा' यानंतर शिवसेनेचा 'हा' नवा उपक्रम
SHARES

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीनं जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. 'आदित्य संवाद', 'जन आशीर्वाद यात्रा' यानंतर आता ‘फ्रेंड्स ऑफ आदित्य ठाकरे’ नावाचा उपक्रम शिवसेनेकडून सुरू करण्यात आला आहे. पक्षीय राजकारणासाठी वेळ देणें शक्य नसलेल्या किंवा त्याबाबत अनुत्सुक असलेल्या विविध व्यावसायिकांना शिवसेनेशी जोडण्यासाठी ‘फ्रेंड्स ऑफ आदित्य ठाकरे’ नावाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

रणनीतीचा भाग

समजातील सर्व थरांत आदित्य ठाकरे व शिवसेना पोहोचवण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून 'फ्रेंड्स ऑफ आदित्य ठाकरे' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास वांद्रे येथील पाली भवनमध्ये हा उपक्रम पार पडला. त्यावेळी रियाझ अमलानी, संज्योत कीर, दिनेश नायर, दिनो मोरिया, तनुज पुगलिया आदींनी यामध्ये सहभाग घेतला होता. महाराष्ट्राला आर्थिक पातळीवर पुढे कसं न्यायचं, राज्यातील पर्यटन उद्योग कसा पुढे नेता येईल, आदी विविध विषयांवर ही मंडळी व आदित्य ठाकरे यांच्यात संवाद झाला.

नवा उपक्रम

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी हाती घेतलेल्या प्लास्टिक बंदी, पर्यावरण आदी विषयांमुळं समाजातील विविध थरांतील लोकांना त्यांच्याबद्दल आस्था वाटत आहे. मात्र, प्रत्यक्ष राजकारणात सहभागी होणं त्यांना शक्य नसते. त्यांना लोकशाही प्रक्रिया, सरकारी कारभार यात सहभागी करून घेता यावं, त्यांच्या सूचना-मतांचा उपयोग करून घ्यावा, या दृष्टिकोनातून त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी 'फ्रेंड्स ऑफ आदित्य ठाकरे' हा उपक्रम सुरू केला आहे. पुढच्या कार्यक्रमात नागरी नियोजन क्षेत्रातील तज्ज्ञ, शिक्षणक्षेत्रात काम करणारी मंडळी, स्टार्ट अपमधील नवउद्यमी अशांचा सहभाग असणार आहे.

'आदित्य संवाद'

याआधी आदित्य ठाकरे यांनी तरूण आणि नव मतदारांना जिंकण्यासाठी लोकसभा निवडणूकीदरम्यान त्यांनी 'आदित्य संवाद' हा उपक्रम राबवला होता. त्यानंतर, जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून त्यांनी सामान्य नागरिकांना भेट दिली. तसंच, लोकसभेसाठी ज्यांनी शिवसेनेच्या बाजूनं कौल दिला होता, त्यांचे आभार मानण्यासाठी आणि ज्यांनी मत नाही दिली त्यांची मनं जिंकायला ही यात्रा काढण्यात आली होती. 



हेही वाचा -

गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्ग वाहतूककोंडी होण्याची शक्यता कमी

प्रसिद्ध संगीतकार खय्याम यांचं निधन, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा