Advertisement

आरटीओची सर्व कामे होणार ऑनलाइन

शिकाऊ वाहन परवाना किंवा वाहन चालविण्याच्या परीक्षेसाठीच आरटीओमध्ये जावं लागणार आहे. इतर सर्व कामांसाठी आरटीओ कार्यालयाची पायरी चढण्याची गरज नागरिकांना भासणार नाही.

आरटीओची सर्व कामे होणार ऑनलाइन
SHARES

आरटीओची सर्व कामे आता आॅनलाइन होणार आहेत. फक्त शिकाऊ वाहन परवाना किंवा वाहन चालविण्याच्या परीक्षेसाठीच आरटीओमध्ये जावं लागणार आहे. इतर सर्व कामांसाठी आरटीओ कार्यालयाची पायरी चढण्याची गरज नागरिकांना भासणार नाही. 

आरटीओच्या सर्व सेवा एका क्लिकवर उपलब्ध होतील, अशी माहिती परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी ट्रॅफिक इन्फोटेक एक्सपो परिषदेत दिली आहे. आता वाहन परवान्याचे आॅनलाइन नूतनीकरण करता येणार आहे. तसंच वाहन परवान्यासाठी आॅनलाइन अर्ज करून तो घरपोच मिळविता येणार आहे. वाहन परवान्यासाठी ई-साइनचा प्रस्ताव सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळेल. त्यानंतर सर्व कामे आॅनलाइन होतील, असं चन्ने यांनी सांगितलं.

शेखर चन्ने म्हणाले की,  आरटीओ कार्यालयांमध्ये एकूण ११० सेवा दिल्या जातात. यामधील ५१ सेवा आॅनलाइन आहेत. नागरिकांना कागदपत्रे आॅनलाइन सबमिट करू येतात. तसंच फी किंवा कर आॅनलाइन भरता येतो. मात्र, त्या अर्जाची प्रिंट काढून सही करून मूळ कागदपत्रे कार्यालयात स्वत: जाऊन द्यावे लागतात. त्यावर सही करण्यासाठी आरटीओ कार्यालयात उपस्थित रहावं लागतं. पण आता ई-साईनद्वारे ही सर्व कागदपत्रेसुद्धा आॅनलाइन सबमिट करता येणार आहेत. त्यामुळे वाहन चालविण्याच्या परीक्षेशिवाय इतर कामासाठी नागरिकांना आरटीओ कार्यालयात जावं लागणार नाही. 



हेही वाचा -

अबब! मुंबईत प्रति किमी 'एवढ्या' आहेत कार

उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला 'या' कारणामुळं फटकारलं




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा