Advertisement

अबब! मुंबईत प्रति किमी 'एवढ्या' आहेत कार

मुंबईत एकूण ३२.५ लाख कार आहेत. तर दिल्लीतील कारची संख्या १०.६ लाख आहे.

अबब! मुंबईत प्रति किमी 'एवढ्या' आहेत कार
SHARES

देशाची आर्थिक राजधानी मुंबई आता वाहनांच्या घनतेतही पुढे आहे. मुंबईत दररोज वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे. देशातील इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत मुंबईत अधिक वाहनं आहेत. मुंबईत आता प्रति किमी ५३० कार आहेत. मागील तीन वर्षांत मुंबईतील कारची घनता २३ टक्क्यांनी वाढली असल्याचं दिसून येत आहे. देशाची राजधानी दिल्लीची तुलना करता मुंबईतील कारची घनता दिल्लीपेक्षा पाचपट आहे. दिल्लीत प्रति किमी १०८ कार आहेत. 

वाढत्या वाहनांमुळे मुंबईतील वाहतुकीवर मोठा परिणाम होत असल्याचं दिसून येते. मुंबईकरांना रोजच वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं. तर वाढतं प्रदुषण ही पण आता मुंबईतील एक मोठी समस्या बनली आहे. मागील तीन वर्षांत मुंबईतील कारची घनता २३ टक्क्यांनी वाढली आहे. मार्च महिन्यात मुंबईत प्रति किमी ५३० कार होत्या. तर  पुणे ३५९, कोलकाता ३१९, चेन्नई २९७, बंगळुरू १४९ अशी कारची घनता आहे.

मुंबईत एकूण ३२.५ लाख कार आहेत. तर दिल्लीतील कारची संख्या १०.६ लाख आहे. दिल्लीच्या तीनपट कार मुंबईत आहेत. रस्त्यांची जागा कमी असल्यामुळे मुंबईत कारची घनता जास्त आहे. मुंबईत २,००० किमी रस्ते आहेत तर दिल्लीत २८,९९९ किमी रस्ते आहेत. मागील आठ वर्षांत वाहनांची संख्या ८२ टक्क्यांनी वाढली आहे. यामध्ये कारची संख्या ७० टक्के आणि दुचाकींची संख्या ९५ टक्क्यांनी वाढली आहे. आठ वर्षांत दुचाकींची संख्या दुपटीने वाढल्याचं दिसून येत आहे. हेही वाचा -

बेस्टचं 'ती शौचालय' सुरू होणार दक्षिण मुंबईत

'जेएनयू'मधील आंदोलनाचे मुंबईत पडसाद
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा