Mumbai
  देव तारी त्याला कोण मारी...

  देव तारी त्याला कोण मारी...

  Share
  Now
  मुंबई  -  

  रत्नागिरीहून दादरला येणाऱ्या धावत्या ट्रेनच्या शौचालयात एका महिलेने बाळाला जन्म दिल्याची घटना नुकतीच घडली आहे. 'देव तारी त्याला कोण मारी' म्हणतात ना असा प्रकार तिकडे घडला. धावत्या ट्रेनच्या शौचालयातून बाळ ट्रॅकवर पडूनही ते सुरक्षित आहे.

  चंदना शाह या 26 वर्षीय महिलेने शौचालयात मुलाला जन्म दिला. चंदना शाह मूळची पश्चिम बंगालची आहे. हे बाळ रत्नागिरीहून दादरला येणारी ट्रेन कासू स्टेशन जवळ येत असता ट्रेनच्या शौचालयामधून ते ट्रॅकवर पडलं. यानंतर महिलेने आरडाओरडा केल्याने ट्रेन तात्काळ थांबवून बाळाला ट्रॅकवरुन सुखरूप उचलण्यात आलं.

  त्यानंतर कासू गावचे रहिवासी आणि रेल्वे कर्मचारी,प्रवाशांच्या मदतीने बाळाला आणि आईला रुग्णालयात दाखल केलं गेलं. दरम्यान दोघंही सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे. 

  Share
  Now
  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.