Advertisement

ST कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर, कामगार न्यायालयाचा निर्णय

संपाच्या विरोधात एसटी महामंडळानं वांद्रे कामगार न्यायालयात धाव घेतली होती.

ST कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर, कामगार न्यायालयाचा निर्णय
SHARES

वांद्रे कामगार न्यायालयानं (bandra labor court) एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिला आहे. गावागावात धावणारी लालपरी अर्थात एसटी बस गेले दोन महिने बंद आहे. पण एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात काही ठिकाणी फूट पडली आहे. त्यामुळे काही कर्मचारी हे कामावर परतले आहे.

संपाच्या विरोधात एसटी महामंडळानं वांद्रे कामगार न्यायालयात धाव घेतली होती. कामगार न्यायालयानं एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा पूर्णपणे बेकायदेशीर ठरवला आहे.

'एसटी बस ही लोकोपयागी सेवा आहे. पण संप करण्याआधी किमान ६ आठवडे नोटीस द्यावी लागते. पण, कामगारांकडून अशी कोणताही नोटीस दिली गेली नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर आहे, असा निर्णया वांद्रे कामगार न्यायालयानं दिला आहे.

दरम्यान, १० जानेवारी रोजी एसटी कामगार संघटनेच्या नेत्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर कामगार संघटनेनं संप मागे घेत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर अनेक आगारात कर्मचारी कामावर परतले आहेत.

तसंच, लालपरी रस्त्यावर आली असून २५० डेपोतील २१५ डेपो सुरू आहेत. २६ हजार ५०० कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. ९२ हजारातील ३१२३ कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहे. आणि सध्या ८८ हजार कर्मचारी पटावर यातील २६५०० कर्मचारी आहे.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपामुळं एसटी महामंडळाला मोठा फटका बसला आहे. एसटी महामंडळाला १२०० कोटी रुपयांचा तोटा झाल्याची माहिती माहिती समोर येत आहे.

कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे एसटीची वाहतूक बंद असल्यानं सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यासाठी वारंवार आवाहन करण्यात आले आहे.



हेही वाचा

एसटी कर्मचारी संप; महामंडळाचं 'इतक्या' कोटींच नुकसान

एसटी कर्मचारी संप: एसटी महामंडाळा चालक भरतीबाबत मोठा निर्णय

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा