रेल्वे स्थानकांचे सुशोभिकरण


  • रेल्वे स्थानकांचे सुशोभिकरण
SHARE

दादर - कधी काळी अस्वच्छ अशी ओळख असलेल्या मुंबईच्या लाईफ लाईनचा आता कायापालट होतोय. मुंबईतल्या 36 रेल्वे स्टेशनवर सध्या सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. या अंतर्गत दादर स्टेशनही विविध रंगांनी रंगले आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशनला आर्ट गॅलरीचे स्वरूप आले आहे. सुशोभिकरणासाठी रेल्वेसोबतच हिंदू नववर्ष स्वागत समितीनेही पुढाकार घेतलाय. छोट्यांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनीच यामध्ये उत्साहाने भाग घेतलाय. या उपक्रमामध्ये 40पेक्षा अधिक चित्रकारांचा सहभाग आहे. मेकिंग अ डिफरन्स फाउंडेशन आणि मुंबई फर्स्ट यांच्या वतीने हमारा स्टेशन हमारी शान हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत हजारो लोक सहभागी झालेत. प्रत्येकाने आपल्या कलेतून या उपक्रमाला हातभार लावलायं. आता जबाबदारी आहे ती आपली ! सुंदर आणि स्वच्छ स्टेशन ठेवण्याची.

संबंधित विषय
ताज्या बातम्या