Advertisement

बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आणखी ३०० इलेक्ट्रीक एसी बस

बेस्टच्या (BEST) ताफ्यात आता आणखी ३०० इलेक्ट्रीक एसी बस (Electric AC bus) दाखल होणार आहेत.

बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आणखी ३०० इलेक्ट्रीक एसी बस
SHARES

बेस्टच्या (BEST) ताफ्यात आता आणखी ३०० इलेक्ट्रीक एसी बस (Electric AC bus) दाखल होणार आहेत. पर्यावरणस्नेही प्रवासासोबत इंधनावरील (Diesel) खर्च कमी करण्यासाठी बेस्ट उपक्रमानं भाडेतत्त्वावरील बसगाड्या दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बुधवारी झालेल्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्तावाला (Proposal) बेस्ट समितीनं (Best Committee) मंजुरी दिली. मार्च २०२० नंतर या बसगाड्या टप्प्याटप्यात बेस्ट ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती मिळते.

बेस्ट उपक्रम केंद्र सरकारच्या (Central Government) फेम योजना टप्पा-२ अंर्तगत विजेवरील बसगाड्या दाखल करत आहेत. बेस्टकडं सध्या विजेवर धावणाऱ्या ३० बसगाड्या आहेत. येत्या काही महिन्यात त्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, बुधवारी बेस्ट समितीच्या बैठकीत (Best Committee Meeting) प्रस्ताव सादर करण्यात आला.

भाडेतत्त्वावरील (Private) या बसगाड्यांसाठी १,२०० कोटी रुपये खर्च येणार आहे. तसंच, यासाठी मुंबई महापालिकेकडून (BMC) निधी घ्यावा, अशी देखिल सूचना केली. शिवसेनेचे आशीष चेंबूरकर (Shiv sena Leader Ashish Chemburkar) यांनी भाडेतत्त्वावरील या बसगाड्यांना येण्यासाठी मुदत असलीच पाहिजे. सध्या बेस्ट उपक्रमात येणाऱ्या भाडेतत्त्वावरील बसगाड्या धीम्या गतीनं येत असून, ते पाहता विजेवरील बसगाड्यांसाठीही कालावधी देण्याची मागणी करण्यात आली. तर कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा (Opposition Leader of Congress Ravi Raja) यांनी यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचे नियोजन व्यवस्थित होणं गरजेचं असल्याचं स्पष्ट केलं.

बेस्ट समिती सदस्यांच्या या सर्व मागण्यांवर (Demands) विचार केला जाणार असल्याचं सांगत विजेवरील ३०० बसगाड्यांचा प्रस्ताव बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर (Best Committee Chairman Anil Patankar) यांनी मंजूर केल्याचं समजतं. विजेवरील बसगाड्यांमध्ये (Electric Bus) १४० एकमजली एसी आणि १६० मिडी एसी बसचा समावेश आहे. एकमजली बसगाड्यांची प्रत्येकी किंमत २ कोटी आणि मिडी बसची किंमत १ कोटी ७० लाख रुपये आहे.

६० दिवसांमध्ये प्रोटो टाईप बसगाडी दाखल होणार आहे. चाचणीनंतर ४ महिन्यांमध्ये २५ टक्के बसगाड्या पुरवठा होणार आहे. त्यानंतर ७ महिन्यांमध्ये ५० टक्के आणि पुढील १० महिन्यात २५ टक्के वीजेवरील बसगाड्या येणार आहेत.



हेही वाचा -

भीमा-कोरेगाव तपाससंबधी सरकार संभ्रमात- प्रकाश आंबेडकर

मुंबईच्या कमाल तापमानात घट



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा