बेस्टच्या कर्मचाऱ्यांना पगारात मिळाली चिल्लर

Mumbai
बेस्टच्या कर्मचाऱ्यांना पगारात मिळाली चिल्लर
बेस्टच्या कर्मचाऱ्यांना पगारात मिळाली चिल्लर
See all
मुंबई  -  

बेस्टचे सध्या बुरे दिन सुरू आहेत. गेल्या काही महिन्यांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनाचीही समस्या कर्मचाऱ्यांना सतावत आहे. त्यातच आता बेस्टच्या कर्मचाऱ्यांना वेतनामध्ये तब्बल 500 रुपये किंमतीची नाणी देण्यात आली. विशेष म्हणजे 10 रुपयांच्या नाण्यांच्या स्वरुपात हे वेतन देण्यात आले आहे. बेस्ट उपक्रम तोट्यात गेल्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन देणेही कठीण झाले आहे. 

फेब्रुवारीच्या थकित वेतनानंतर बेस्टची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मार्च महिन्याचेही वेतन २० एप्रिलला देण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार, गुरुवारी वेतन बँकेत जमा करण्यात आले. परंतु, या वेतनाचाच भाग म्हणून ५०० रुपये सुट्ट्या नाण्यांच्या स्वरूपात देण्याचा अजब निर्णय घेण्यात आला. अशाप्रकारे पगारात सुट्टे पैसे हाती पडल्यामुळे कर्मचारी नाराज झाले आहेत.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.