Advertisement

आर्थिक तोट्यात अडकलेल्या बेस्टला नव्या बसेसचा दिलासा


आर्थिक तोट्यात अडकलेल्या बेस्टला नव्या बसेसचा दिलासा
SHARES

खासगी गाड्यांच्या तुलनेत मुंबईत कमी तिकीट दरात सेवा पुरवणारी बेस्ट बस गेली अनेक वर्षा मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सहन करत आहे. बेस्टनं विविध बॅंकांमधून घेतलेल्या कर्जामुळं कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळत नाही. परिणामी कर्मचाऱ्यांची आर्थिक संकट आल्यानं त्यांची संपाच हत्यार उपसलं. त्यातच प्रवासी संख्याही कमी झाली. त्यामुळं बेस्टनं उपक्रमातील बसचा ताफा वाढविण्याचा व भाडेकपातीचा निर्णय घेतला. त्यानुसार, बेस्टच्या ताफ्यात हळुहळू बस दाखल होत आहेत. नुकताच मिडी, मिनी बस, इलेक्ट्रीक बस, वातानुकूलित बस दाखल झाल्या आहेत.      

भाडेतत्त्वावर घेतलेल्या मिनी बसनी बेस्ट उपक्रमाला मोठा दिलासा दिला आहे. प्रवासी संख्येत झालेली घट या बसनी भरून काढल्याचं चित्र दिसत आहे. या बसगाड्या दररोज प्रवाशांनी खचाखच भरून जात आहेत. प्रवासी संख्या आता १४ लाखांनी वाढल्याची माहिती मिळते.

एकेकाळी मुंबईची दुसरीलाइफ असलेली बेस्ट आधुनिक जगात नाहिशी होत गेली. २०१४-१५ या वर्षात बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमधून सरासरी ३४ लाख प्रवासी प्रवास करत होते. मात्र, जून २०१९पर्यंत ही संख्या सरासरी १७ लाखांवर आली होती. यावेळी बेस्टला मोठ्या प्रमाणात आर्थिक तोट्याला सामोर जावं लागत होतं. विविध बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाच्या बोजापायी प्रवासी संख्या घटली. त्यामुळं या प्रवाशांना बेस्टकडं पुन्हा वळविण्यासाठी बेस्टनं अनेक सोयीसुविधा उपलब्ध केल्या. परंतु, तरीही बेस्टच्या तोट्यात वाढच होत होती.

अखेर ७ जुलैपासून बेस्ट उपक्रमानं प्रवासी भाडे किमान ५ ते कमाल २० रुपये करण्याचा निर्णय घेतला. तिकीट दरात कपात केल्यामुळे प्रवासी संख्येत वाढ होऊन महिन्याभरात ११ लाखांची वाढ झाली. मात्र, बसगाड्या कमी असल्यानं प्रवाशांची गैरसोय होत होती. त्यामुळं बेस्टनं बसचा ताफा वाढविण्याचा निर्णय घेतला असून, येत्या वर्षभरात १० हजारांवर नेण्याचा निर्धार केला आहे.

त्यानुसार, वातानुकूलित मिनी, मिडी, इलेक्ट्रिक, हायब्रीड बस गाड्यांची फौज वाढविण्यात येणार आहे. काही मिनी बसगाड्यांची सेवा सुरू करण्यात आली आहे. सकाळी कार्यालयात जाण्यासाठी घरातून निघणाऱ्या प्रवाशांची या मिनी सेवेला पसंती मिळत आहे. त्यामुळं प्रवासी संख्या झपाट्यानं वाढत आहे. भाडेतत्त्वावर २ महिन्यांपूर्वी घेतलेल्या १६६ वातानुकूलित मिनीबस गाड्या कमी अंतराच्या मार्गावर चालविण्यात येत आहेत. तर, इलेक्ट्रिक आणि मिडीबस गाड्या जास्त अंतराच्या प्रवासासाठी वापरल्या जात आहेत.

अंधेरी पश्चिम मार्गावर धावणाऱ्या ६३ वातानुकूलित बसगाड्या गर्दीच्या वेळेत खचाखच भरलेल्या असतात. गेल्या २ दिवसांत २१ वातानुकूलित मिनी बसगाड्या कुलाबा बस आगारापासून चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत सोडण्यात येत आहेत. तर २५ वातानुकूलित बसगाड्या वडाळा बस आगारातून चालविण्यात येत आहेत. ६ महिन्यांपूर्वी बेस्टच्या ताफ्यात ३२०० बसगाड्या होत्या. त्यात आता वाढ झाली आहे. प्रवासी संख्या जून २०१९ पर्यंत दररोज सरासरी १७ लाख होती. तिच आता प्रवासी भाड्यात कपात केल्यानंतर २७ लाख झाली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा