Advertisement

आगोदरच्या निधीच्या खर्चाचे तपशील देईपर्यंत बेस्टचं पुढील अनुदान स्थगित

मुंबईची दुसरी लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्टच्या आर्थिक स्थिती बिकट होण्याची शक्यता आहे.

आगोदरच्या निधीच्या खर्चाचे तपशील देईपर्यंत बेस्टचं पुढील अनुदान स्थगित
SHARES

मुंबईची दुसरी लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्टच्या आर्थिक स्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. कारण आता बेस्टला पुढील अनुदानासाठी महापालिकेला आतापर्यंत दिलेल्या अनुदानाची माहिती द्यायची आहे. बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून महापालिकेनं बेस्टला आतापर्यंत अडीच हजार कोटी रुपये दिले असले तरी आता या अनुदानाचा विनियोग कसा केला, त्याची माहिती आधी स्थायी समितीला द्या, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.

इतकंच नव्हे तर हा तपशील मिळेपर्यंत पुढील अनुदानाचे टप्पे स्थगित करा, असेही निर्देश त्यांनी दिले आहेत. बेस्ट उपक्रमाचा २०२१-२२चा अर्थसंकल्प बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत पटलावर मांडण्यात आला. त्यावेळी अध्यक्षांनी हे निर्देश दिले.

बेस्ट उपक्रमाला आतापर्यंत जे अनुदान दिले, त्याचा विनियोग वेगळ्याच कारणांसाठी केला गेला. त्यामुळं बेस्टनं आधी हिशेब सादर करावा, अशी मागणी स्थायी समिती सदस्यांनी केली. माजी आयुक्त अजोय मेहता यांनी अनुदान देण्यास नकार दिला होता, तर तत्कालीन आयुक्त प्रवीण परदेशी यांनी अनुदान देत आर्थिक मदतीचा हात पुढे केला. परंतु किती दिवस पालिकेकडून अनुदानाची अपेक्षा ठेवणार, स्वावलंबी होण्याचा विचार करणार की नाही, असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सुनावलं.

महापालिकेनं आतापर्यंत जे अनुदान दिलं त्याचा विनियोग परिवहन विभागासाठी न करता अन्य कामांसाठी केला आहे. त्यामुळं आतापर्यंत महापालिकेकडून मिळालेल्या अनुदानाचा काय व कुठे वापर केला याचा हिशेब आधी द्या, तोपर्यंत यापुढे अनुदान देण्यात येणार नाही, असे आदेश जाधव यांनी संबंधित विभागाला दिले.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा