Advertisement

रेल्वे सेवेमुळं बेस्टच्या प्रवासी संख्येत घट

मुंबईत गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनानं शिरकाव केला. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आलं.

रेल्वे सेवेमुळं बेस्टच्या प्रवासी संख्येत घट
SHARES

मुंबईत गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनानं शिरकाव केला. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आलं. या लॉकडाऊनमुळं मुंबईची लाइफलाइन लोकल सेवा बंद करण्यात आली. मात्र, लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर सुरूवातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू झालेली लोकल सेवा आता सर्वसामान्यांसाठी सुरू झाली. १ फेब्रुवारीपासून लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, लोकल सुरू झाल्यानं बेस्ट उपक्रमाच्या प्रवासी संख्येत मागील आठवडाभरात सुमारे १ लाख एवढी घट झाली.

मार्च २०२०मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं होतं. त्यामुळं २३ मार्चपासून मुंबईतील लोकल सेवा सर्वांसाठी बंद करण्यात आली. त्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बेस्ट बसगाड्यांनी दिलासा दिला. तसंच, 'मिशन बिगीन अगेन'चा पहिला टप्पा जून महिन्यात सुरू झाल्यानंतरही सर्वसामान्य मुंबईकरांना बेस्ट बसचाच आधार होता.

या काळात प्रवासी संख्या वाढून १७ लाखांवर पोहोचली. मुंबईतील सर्व व्यवहार आता हळूहळू सुरू झाले आहेत. त्यामुळं जानेवारी अखेरपर्यंत बसगाड्यांमधून दररोज सरासरी २८ लाख प्रवासी प्रवास करीत होतं. मात्र, १ फेब्रुवारी २०२१पासून लोकल सेवा मुंबईकरांसाठी सुरू करण्यात आली. यामुळं पुन्हा एकदा काही प्रवासी रेल्वे प्रवासाकडे वळले आहेत. याचा परिणाम बेस्टच्या प्रवासी संख्येवर झाला. गेल्या आठवड्यात दररोज सरासरी १० ते २० हजार प्रवासी संख्येत घट दिसून आली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा