Advertisement

बेस्टचा २०२१-२२ आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प सादर; विद्युत विभागाला तोटा

बेस्टच्या २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात एकूण २,२४९ कोटी ७४ लाख रुपयांचा तोटा दाखविला होता.

बेस्टचा २०२१-२२ आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प सादर; विद्युत विभागाला तोटा
SHARES

बेस्ट उपक्रमानं शनिवारी २०२१-२२ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात यापूर्वी फायद्यात असलेल्या विद्युत विभागाला तोटा झाल्याचे, तर परिवहन विभागातील तूट कमी झाल्याची माहिती समोर येत आहे. परिवहन आणि विद्युत विभागाचा मिळून १,८८७ कोटी ८३ लाख रुपयांचा तुटीचा अर्थसंकल्प अंदाज बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी शनिवारी सादर केला.

बेस्टच्या २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात एकूण २,२४९ कोटी ७४ लाख रुपयांचा तोटा दाखविला होता. तुलना केल्यास यंदाच्या २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात तूट कमी झाल्याचे दिसून येते. परंतु गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात विद्युत विभाग ९९ कोटी रुपयांनी फायद्यात होता. यंदा हा विभागही तोट्यात असल्याने बेस्टसमोर मोठी चिंता आहे.

विद्युत विभागाला यंदा प्रथमच २६३ कोटी ५९ लाख रुपये तोटा झाला आहे. तर परिवहन विभागाचा तोटा काहीसा कमी झाला आहे. कोरोना व्हायरसचा काळात बसलेला आर्थिक फटका, मुंबई पालिकेने अनुदानात केलेली कपात यामुळे आर्थिक तोटा सहन करणाऱ्या बेस्टला सावरण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

परिवहन विभागाचा २ हजार ३४९ कोटी रुपये असलेला तोटा, यावेळी १ हजार ६२४ कोटी २४ लाख रुपयांपर्यंत दाखवण्यात आला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा