मुंबई - बेस्ट प्रशासनाने बेस्ट बसच्या तिकीटासाठी आणि विज बिल भरणासाठी 500,1000 च्या जून्या नोटा स्वीकारणार नसल्याचे जाहीर केलंय. त्यामुळे प्रवाशांना तिकीटा साठी बिल भरण्यासाठी सुट्टे पैसे मोजावे लागणार आहेत. मात्र जुने पासधारक आणि नवीन पास धारकांकडून पास काढताना 500-1000च्या नोटा स्वीकारल्या जाणार असल्याचे सांगत बेस्टप्रशासनाने थोडासा दिलाय. 11 नोव्हेंबरपर्यंत बेस्टपास केंद्रावर जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार असल्याचेही माहिती यावेळी बेस्टच्या प्रवक्त्यांनी दिली.