Advertisement

प्रवाशांनो, मेट्रो स्टेशन ते बीकेसीपर्यंत 'बेस्ट' एसी सेवा

बीकेसी ते पश्चिम द्रुतगती माहामार्ग मेट्रो स्थानकापर्यंत बेस्टने नवीन एसी बस सेवा सुरू केली आहे. या बसचा 16 हा क्रं असून नवीन मार्गावर दररोज सकाळी 8 ते संध्याकाळी 5.30 च्या दरम्यान दर 40 मिनिटाला एक याप्रमाणे फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. दिवसभरात अशा 23 फेऱ्या चालवण्यात येतील.

प्रवाशांनो, मेट्रो स्टेशन ते बीकेसीपर्यंत 'बेस्ट' एसी सेवा
SHARES

जर कामानिमित्ताने रोज बीकेसी ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मेट्रो स्टेशनपर्यंतचा प्रवास कॅबने करावा लागत असेल तर निश्चितच तुमच्या खिशाला खड्डा पडला असेल. पण आता हा प्रवास अधिक आरामदायी, कमी खर्चिक आणि गारेगार होणार आहे. कारण बेस्टने पश्चिम द्रुतगती मार्गावरील मेट्रो स्थानक ते बीकेसी दरम्यान नवीन बस सेवा सुरू केली आहे.

बीकेसी ते पश्चिम द्रुतगती माहामार्ग मेट्रो स्थानकापर्यंतची ही एसी बस सेवा सोमवरपासून सुरू झाली आहे.


एसी बसफेऱ्या यावेळेत

या बसचा 16 हा क्रं असून नवीन मार्गावर दररोज सकाळी 8 ते संध्याकाळी 5.30 च्या दरम्यान दर 40 मिनिटाला एक याप्रमाणे फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. दिवसभरात अशा 23 फेऱ्या चालवण्यात येतील.


या ठिकाणी थांबे

बीकेसी ते पश्चिम द्रुतगती मार्गावरील सर्व महत्त्वाच्या स्थानाकावर या बसचे थांबे असतील. ज्यामध्ये देशांतर्गत विमानतळ, वाकोला पोलीस चौकी, कला नगर, वांद्रे कौटुंबिक न्यायालय, आरबीआय, आयटी इमारत, आयसीआयसीआय बॅंक, डायमंड बोर्से, सिटीबॅंक, बीकेसी टेलिफोन एक्सचेंज या सर्व ठिकाणी ही बस थांबणार आहे.

या बेस्ट सेवेला सोशल मीडियावर चांगला पाठींबा मिळत आहे. दररोज पश्चिम द्रुतगती महामार्ग मेट्रो स्थानकांतून जवळपास 23,500 प्रवासी प्रवास करतात. खासगीपेक्षा सार्वजनिक वाहतूक सेवेचा लोकांनी जास्तीत जास्त वापर करावा, यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचं बेस्टकडून सांगन्यात आलं

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा