Advertisement

खारघर ते बीकेसी मार्गावर प्रीमियम एसी बसेस धावणार

याशिवाय बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात आणखी ४० प्रीमियम एसी बस दाखल झाल्या आहेत.

खारघर ते बीकेसी मार्गावर प्रीमियम एसी बसेस धावणार
SHARES

बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) उपक्रमाने गुरुवारी सांगितले की ते आणखी एका  मार्गावर प्रीमियम एसी बस सुरू होणार आहे.  खारघर ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) या मार्गावर पुढील आठवड्यापासून एसी प्रीमियम बस सेवा सुरू होणार आहे. 

खारघर ते बीकेसी दरम्यान प्रीमियम बससेवा चालवण्याची प्रवाशांची मागणी आहे. तिकिटाचे भाडे रु. 175 ते रु. 180 पर्यंत असेल.

याशिवाय बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात आणखी ४० प्रीमियम एसी बस दाखल झाल्या असून, पुढील आठवड्यापासून टप्प्याटप्प्याने त्या सेवेत येणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली. त्यामुळे बेस्टमधील प्रीमियम बसची एकूण संख्या 100 होणार आहे.

एकूण 200 बस दाखल करण्यात येणार आहेत. या बस जानेवारी किंवा फेब्रुवारी, २०२३पर्यंत येणे अपेक्षित होत्या. सध्या ६० प्रीमियम एसी बस बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात आहेत.

आणखी ४० बस ताफ्यात आल्या असून, त्या पुढील आठवड्यापासून प्रवाशांच्या सेवेत येणार आहेत. 

बेस्ट उपक्रमाने मोबाइल ॲप आधारित आरक्षित होणारी पहिली प्रीमियम एसी बस सेवा १२ डिसेंबर, २०२२पासून ठाणे ते वांद्रे-कुर्ला संकुल आणि वांद्रे-कुर्ला संकुल ते वांद्रे स्थानक दरम्यान सुरू केली.

त्यानंतर ठाणे ते पवई, मुंबई विमानतळ ते कफ परेड आणि मुंबई विमानतळ ते खारघर मार्गावरही प्रीमियम बस सेवा सुरू केल्या. या सर्व मार्गांवर दररोज हजारो प्रवाशांचा प्रवास प्रीमियम बसमधून होत आहे.

‘चलो’ मोबाइल ॲपद्वारे या बसमधील आसने प्रवाशांना आरक्षित करता येतात. या बसचा मार्ग, अपेक्षित वेळ, त्या मार्गावर आणखी किती बस सेवा असतील, याची माहिती ॲपवर समजते.

बेस्ट चलो मोबाइल अॅपद्वारे प्रवासी सेवा बुक करू शकतात. बसेसमध्ये कंडक्टर नसल्यामुळे पेमेंट मोड पूर्णपणे ऑनलाइन आहे. प्रवासी टॅप-इन टॅप-आउट सुविधा देखील वापरू शकतात.

यामुळे बसमध्ये चढताना टॅप-इन करण्यासाठी आणि उतरताना टॅप-आउट करण्यासाठी प्रवाशाला त्याचा मोबाइल किंवा स्मार्ट कार्ड वॉलेट वापरता येतो. ऑनलाइन वॉलेटमधून भाडे स्वयंचलितपणे मोजले जाते आणि कापले जाते.


हेही वाचा

रेल्वे मंत्रालयाने 238 एसी रेकच्या खरेदीला मंजुरी दिली

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा