Advertisement

बाप्पाच्या दर्शनासाठी रात्री बेस्टच्या जादा बसगाड्या


बाप्पाच्या दर्शनासाठी रात्री बेस्टच्या जादा बसगाड्या
SHARES

दरवर्षी गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळ वेगवेगळ्या कल्पनेवर आकर्षित देखावे गणेशभक्तांसाठी सादर करतात. मुंबईतील विविध मंडळांच्या बाप्पाचं दर्शन घेण्याबरोरच आकर्षित देखावे पाहण्यासाठी मुंबईसह राज्यभरातून लोक येत असतात. अशावेळी पर्यटकांची रात्रीच्यादरम्यान गैरसोय होऊ नये, यासाठी बेस्टकडून जादा बसगाड्या सोडल्या जाणार आहेत.


बसचं वेळापत्रक

यंदा गणेशोत्सवानिमित्त १८ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यंत बेस्ट बसच्या रात्रीच्या कालावधीत ६३ बसफेऱ्या चालवल्या जातील. या बसफेऱ्या कुलाबा परिसरातून उत्तर पश्चिम मुंबईकडील गिरगाव, लालबाग आणि परळ मार्गे प्रवर्तित होणाऱ्या बसमार्ग क्रमांक १, ७ मर्या., २१ मर्या., २२ मर्या., ४२, ४४, ६६, ६९ या बसमार्गावर सोडण्यात येतील.


गौरी-गणपतीच्या विसर्जनानंतर सार्वजनिक गणपती मंडळांना भेट देण्यासाठी जगभरातील पर्यटक तसेच स्थानिक प्रवासी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. यामध्ये विषेशत: मुंबई आणि पुण्यातील गणपती मंडळांचे आकर्षक देखावे पाहण्यासाठी गर्दी करतात. यावेळी दिवसा प्रवास करण्यासाठी बेस्टच्या बसगाड्या पुरेशा प्रमाणात असतात. मात्र, रात्री बसप्रवर्तन तुरळक प्रमाणात असल्यामुळे या कालावधीतही जादा बसगाड्या सोडल्या जाणार आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा