रक्षाबंधनाच्या दिवशी बेस्टतर्फे जादा बसगाड्या

रक्षाबंधनाच्या दिवशी बेस्ट उपक्रमातर्फे मुंबई शहर आणि उपनगरात जादा बस गाड्या सोडण्यात येतील. रक्षाबंधन सणाला प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि गर्दीमुक्त व्हावा यासाठी २६ ऑगस्ट रोजी बेस्टकडून ज्यादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.

  • रक्षाबंधनाच्या दिवशी बेस्टतर्फे जादा बसगाड्या
  • रक्षाबंधनाच्या दिवशी बेस्टतर्फे जादा बसगाड्या
SHARE

रक्षाबंधना सणानिमित्त मुंबईकरांसाठी बेस्टनं खूशखबर दिली आहे. कारण या सणाच्या दिवशी बेस्ट उपक्रमातर्फे मुंबई शहर आणि उपनगरात जादा बस गाड्या सोडण्यात येतील. रक्षाबंधन सणाला प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि गर्दीमुक्त व्हावा यासाठी २६ ऑगस्ट रोजी बेस्टकडून ज्यादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.


WhatsApp Image 2018-08-23 at 4.45.33 PM.jpeg

१९७ जादा बसेस

रक्षाबंधन रविवारी येत असून या दिवशी मुंबईसह उपनगरात प्रवाशांची मोठ्याप्रमाणात गर्दी होते. त्यामुळं प्रवाशांच्या सोयीकरता बेस्ट उपक्रमांतर्गत विविध बसमार्गांवरून एकूण १९७ जादा बसेस सोडण्यात येतील. या बसगाड्यांचं प्रवर्तन सकाळी १०.३० वाजल्यापासून दिवसभर चालू राहणार आहे.

WhatsApp Image 2018-08-23 at 4.45.32 PM.jpeg


प्रवाशांच्या मदतीसाठी...

प्रवाशांच्या मदतीसाठी बसथांब्यावर तसेच बसस्थानकावर बसनिरीक्षक, वाहतूक अधिकारी तसेच सुरक्षा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती बेस्टकडून देण्यात आली आहे.


हेही वाचा -

भावाला राखी पाठवण्यासाठी बहिणींची पोस्ट ऑफिसमध्ये गर्दी

संबंधित विषय
ताज्या बातम्या