Advertisement

मुंबईकरांच्या दिमतीला हायब्रिड बस


मुंबईकरांच्या दिमतीला हायब्रिड बस
SHARES

अनेक दिवसांपासून बस आगारात धुळखात पडलेली इलेक्ट्रिकल हायब्रिड बस अखेर शुक्रवारपासून मुंबईतल्या रस्त्यांवर धावू लागली आहे. एमएमआरडीएने खरेदी केलेल्या या हायब्रीड बसचं लोकार्पण शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं.



बसचं तिकीट किती?

अंतर्गत वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने २५ हायब्रीड बस बेस्टला चालवण्यासाठी दिल्या असून त्यासाठी बेस्टच्या चालकाला प्रशिक्षण देण्यात आलं आहे. या बसचं तिकीट २० ते ११० रुपयांच्या दरम्यान असेल. वीज आणि डिझेलवर चालणारी ही बस वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथून कांदिवली, ठाणे आणि नवी मुंबईसाठी धावेल. या २५ बसच्या खरेदीसाठी एकूण ५० कोटींचा खर्च करण्यात आला आहे.


छोट्या पल्ल्यांचे बसमार्ग

बस मार्ग


वांद्रे रेल्वे टर्मिनस ते डायमंड मार्केटस. ९ ते संध्या. ७
कुर्ला स्थानक ते स्टेट बँक ऑफ इंडिया स. ९ ते संध्या. ७
वांद्रे रेल्वे टर्मिनस ते सीए इन्स्टिट्यूटस. ९ ते संध्या. ७
राणी लक्ष्मी बाई चौक ते बीकेसी (धारावी आगार मार्गे)स. ९ ते संध्या. ७
राणी लक्ष्मीबाई चौक (सायन) ते बीकेसी ( लाल बहादूर शास्त्री मार्गस. ९ ते संध्या. ७


लांब पल्ल्यांचे बसमार्ग

बस मार्गवेळ
बोरिवली रेल्वे स्थानक ते बीकेसी दुरध्वनी केंद्रस. ७.३०, ७.४५, ८.००,८.१५, ८.३०
बीकेसी दुरध्वनी केंद्र ते बोरिवली रेल्वे स्थानकसंध्या. ६.००, ६.१५, ६.३०, ६.४५, ७.००
हिरानंदानी इस्टेट ठाणे ते एमएमआरडीए कौटुंबिक न्यायालयस. ७.३०, ७.४५, ८.००,८.१५
एमएमआरडीए कौटुंबिक न्यायालय ते हिरानंदानी इस्टेट ठाणेसंध्या. ६.००, ६.२०, ६.४०, ७.००
जलवायू विहार खारघर ते एमएमआरडीए कौटुंबिक न्यायालयस. ७.३०, ७.४५, ८.००,८.१५
एमएमआरडीए कौटुंबिक न्यायालय ते जलवायू विहार खारघरसंध्या. ६.००, ६.२०, ६.४०, ७.००
महाराणा प्रताप चौक (मुलुंड) ते एमएमआरडीए कौटुंबिक न्यायालयस. ७.३०, ७.४५, ८.००,८.१५
एमएमआरडीए कौटुंबिक न्यायालय ते महाराणा प्रताप चौक (मुलुंड)संध्या. ६.००, ६.२०, ६.४०, ७.००


प्रवाशांसाठी सुविधा

स्वयंचलित दरवाजे असलेल्या या वातानुकूलित हायब्रीड बसमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी वायफाय, मोबाईल चार्जिंग पॉईंट, टीव्ही, एफएम, सीसीटीव्ही डस्टबिन या अत्याधुनिक सुविधाही उपलब्ध असतील. शिवाय वरिष्ठ नागरिक आणि महिलांसाठी ४ सीट राखीव असतील या बसची प्रवासी क्षमता ३० इतकी आहे.


बीकेसी स्मार्ट सिटी बनवणार

आंतरराष्ट्रीय स्तरावर वांद्रे कुर्ला संकुलाचा विकास करण्याचे एमएमआरडीएने योजले आहे. त्याच धर्तीवर अंतर्गत वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी या २५ हायब्रीड बस एमएमआरडीएने बेस्टला दिलं आहे. टाटा मोटर्सने पहिल्यांदाच अशा प्रकारची बस तयार केली आहे. 


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा