'एमएमआरडीए'ला 31 कोटींचा भुर्दंड

  Bandra west
  'एमएमआरडीए'ला 31 कोटींचा भुर्दंड
  मुंबई  -  

  मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) अर्थात रिलायन्स इ्न्फ्राच्या चुकीच्या कामाचा फटका मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)ला बसणार आहे.

  वर्सोवा येथील होमगार्डच्या मालकीची 2.4 हेक्टर जागा कास्टिंग यार्डसाठी वापरणाऱ्या 'एमएमओपीएल'ने या जागेच्या भाड्याची 31 कोटी 6 लाख 12 रुपयांची रक्कमच अदा केलेली नाही.


  रक्कम व्याजासहित भरा

  त्यामुळे आता होमगार्डने ही रक्कम व्याजासह त्वरीत भरण्याचा तगादा 'एमएमआरडीए'कडे लावला आहे. त्यामुळे 'एमएमओपीएल'च्या या चुकीचा फटका आता 'एमएमआरडीए'ला बसणार असल्याची बाब माहिती अधिकाराखाली उघड झाली आहे.


  कास्टींग यार्डसाठी जागा

  माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मिळवलेल्या माहितीनुसार 10 डिसेंबर 2007 ला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी होमगार्डची ही जागा तात्पुरत्या स्वरूपात कास्टींग यार्डसाठी देण्याची विनंती केली.


  प्रशिक्षण केंद्राचे आश्वासन

  त्यानुसार 1.99 कोटी केंद्र सरकारने राज्य शासनास देत ही जागा कास्टींग यार्डसाठी देण्याचे कबुल केले. मात्र त्या मोबदल्यात तिथे काम पूर्ण झाल्यास प्रशिक्षण केंद्र बांधून देण्याचे आश्वासन घेत यासंबंधीचा करार 2010 मध्ये केला.


  दोन वर्षांसाठी दिली जागा

  दोन वर्षासाठी ही जागा 'एमएमआओपीएल'ला देण्यात आली. मात्र आता सात वर्षे होत आली तरी 'एमएमओपीएल'ने ही जागा हस्तांतरीत केलेली नाही वा तेथे प्रशिक्षण केंद्रही बांधले नाही. इतकेच नव्हे तर भाड्याची रक्कमही भरली नाही.

  दरम्यान 29 जून 2015 रोजी 'एमएमओपीएल'ने 3 कोटी 97 लाख 98 हजार इतकी रक्कम भरली. पण भाडे, सर्विस टॅक्स आणि व्याज अशी मिळून 31 कोटी 6 लाख 12 रुपयांची रक्कम काही अदा केली नाही.


  30 महिने उलटूनही बांधकाम नाही

  'एमएमआरडीए'ने 14 कोटी रुपये मंजूर करून घेत प्रशिक्षण बांधून देण्याचे मान्य केले होते. पण यालाही 30 महिने उलटले तरी बांधकाम काही झालेले नाही. त्यामुळे चिडलेल्या होमगार्ड विभागाने 17 मार्च 2017 रोजी पत्र पाठवून प्रशिक्षण केंद्र बांधा नाहीतर भाड्याची रक्कम व्याजासकट अदा करा, असे ठणकावले आहे.

  त्यामुळे आता 'एमएमओपीएल'वर फसवणूकीचा गुन्हा दाखल करत ही रक्कम त्यांच्याकडून वसूल करावी, अशी मागणी गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.  हे देखील वाचा -

  बीकेसीतून 2022 मध्ये धावणार पहिली बुलेट ट्रेन

  अखेर म्हाडाने विजेत्यांना पाठवली सूचनापत्र  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.