बीकेसीतून 2022 मध्ये धावणार पहिली बुलेट ट्रेन

  Mumbai
  बीकेसीतून 2022 मध्ये धावणार पहिली बुलेट ट्रेन
  मुंबई  -  

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अशी ओळख मिळालेल्या 'बुलेट ट्रेन'ला अखेर मुहूर्त सापडला आहे. एमएमआरडीएचा विरोध मावळल्यानंतरही असंख्य अडचणीत सापडल्याने वांद्रे-कुर्ला संकुला (बीकेसी) मध्ये बुलेट ट्रेनचे टर्मिनस होईल की नाही? यावर प्रश्नचिन्ह होते. मात्र आता या टर्मिनसपुढील सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून बीकेसीतून पहिली बुलेट ट्रेन 2022 मध्ये धावणार आहे.

  मुंबई ते अहमदाबाद मार्गावर धावणाऱ्या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे प्रारंभीचे स्थानक म्हणून बीकेसीवर शिक्कामोर्तब झाले आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ९७ हजार कोटी आहे. नवी दिल्ली येथील रेल्वे भवनात झालेल्या बैठकीत रेल्वे बोर्डाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी बीकेसीतील स्थानकासाठी राज्य सरकारकडून संमती मिळाल्याची माहिती सोमवारी दिली.


  हेही वाचा

  १൦ वर्षांनंतर अशी असेल मुंबई...

  आता हायफाय तेजस धावणार `मुंबई टू अहमदाबाद`


  यावेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे समोरील आव्हानांचा आढावा घेतानाच त्यावर मात करण्यासाठी योजना राबविल्या जात असून त्यास यश येत असल्याची माहिती दिली.

  बुलेट ट्रेनसाठी जपानच्या 'जायका'कडून अर्थसहाय्य मिळणार आहे. हा प्रकल्प 2022 मध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य रेल्वे बोर्डापुढे असल्याचे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए.के. मित्तल यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पाचे पहिले स्थानक कुठले असेल यावरून सुरू असलेला घोळ मित्तल यांच्या व्यक्तव्याने पूर्णपणे मिटला आहे.

  महाराष्ट्र सरकारचे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र देखील बीकेसीमध्ये उभारण्यात येणार आहे. त्यामुळे एमएमआरडीए ही जागा रेल्वे बोर्डाला देण्यास तयार नव्हते. या पार्श्वभूमीवर मित्तल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतल्यानंतर ही जागा बुलेट ट्रेन टर्मिनसाठी देण्याचे त्यांनी मान्य केले. त्यामुळे बुलेट ट्रेन बीकेसीतून सुटणार का? या चर्चेस पूर्णविराम मिळाला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.