Advertisement

बेस्ट बसमध्ये आता होणार मोबाईल चार्जिंग!


SHARES

सतत तोट्यात चालणाऱ्या 266 एसी बसेस बंद करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला असला तरी बेस्टच्या ताफ्यात नव्या कोऱ्या 303 बसेस दाखल होत आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 74 बसेस बेस्टच्या ताब्यात आल्या असून, त्यांची आरटीओकडे नोंदणी सुरू आहे.

अत्याधुनिक आणि दणकट अशा टाटा कंपनीच्या या नव्या बस असून, यामध्ये प्रवाशांसाठी अनेक सुविधा दिल्या गेल्या आहेत. बॅकबे आगारात उभ्या असलेल्या या नव्या बसेस लवकरच मुंबईकर प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील. 50 ते 55 लाख रुपये एका बसची किंमत आहे.

काय आहे नव्या बसमध्ये -

  1. ऑटोमॅटिक गिअर सिस्टीम
  2. प्रवाशांसाठी मोबाईल चार्जिंगची व्यवस्था
  3. दिव्यांगांसाठी सीटबेल्ट
  4. ट्युबलेस टायर
  5. रुंद दरवाजे
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा