Advertisement

बेस्टमध्ये कंत्राटी वाहक भरण्यास विरोध

बेस्ट (best) च्या बसगाड्यांवर आता कंत्राटी वाहक (Conductor) नियुक्त केले जाणार आहेत. मात्र, कंत्राटी वाहक नियुक्त करण्यास बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने कडाडून विरोध केला आहे.

बेस्टमध्ये कंत्राटी वाहक भरण्यास विरोध
SHARES

बेस्ट (best) च्या बसगाड्यांवर आता कंत्राटी वाहक (contract conductor) नियुक्त केले जाणार आहेत. मात्र, कंत्राटी वाहक नियुक्त करण्यास बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने कडाडून विरोध केला आहे. एकाही कंत्राटी कर्मचाऱ्याला बेस्टच्या आगारात किंवा बेस्ट बसगाड्यांमध्ये (bus) प्रवेश दिला जाणार नाही, अशी इशारा संयुक्त कामगार कृती समितीने घेतला आहे. 

बेस्ट (best) ने घेतलेल्या भाडेतत्त्वावरील बसगाड्यांवरील (bus) चालक हे सदर कंपनीचे नियुक्त केले आहेत. त्यापाठोपाठ आता बेस्टच्या स्वतःच्या बसेसवर कंत्राटी वाहक नियुक्त केले जाणार असल्याने बेस्ट कर्मचारी (employee) संतप्त झाले आहेत. कंत्राटी वाहक भरण्यास कर्मचाऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. बेस्ट संयुक्त कृती समितीने सोमवारी विविध मागण्यांसाठी कोतवाल गार्डन ते वडाळा आगारापर्यंत लाँग मार्च (Long march) काढला होता. यामध्ये कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुंबई पालिका अर्थसंकल्पात विलीनीकरण तातडीने करा, कामगारांच्या सेवाशर्ती काढून घेऊ नका, बेस्टने स्वत:च्या बसगाडय़ा विकत घेणे, निवृत्तांचे पैसे द्या, रिक्त जागा भरा, विनावाहक बसगाडय़ा बंद करा, मालमत्ता बिल्डर व कंत्राटदारांना देऊ नका, अशा मागण्या बेस्ट कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. 

 बेस्ट संयुक्त कृती समितीचे नेते शशांक राव यांनी म्हटलं की, भाडेतत्त्वावरील बसगाड्या (bus) चालवून बेस्ट (best) ची खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचं स्पष्टच दिसून येत आहे.  आता तर बेस्टच्या स्वत:च्या बसेसवरही वाहक (Conductor) हे कंत्राटी कर्मचारी म्हणून नेमण्याची तयारी सुरू आहे.  डिसेंबर २०१९ मध्ये निविदा काढण्यात आली होती. दोन दिवसांत ती खुली होणार आहे. यामध्ये  बेस्ट संयुक्त कृती समितीचे नेते शशांक राव यांनी म्हटलं की, भाडेतत्त्वा-


म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातवरील बसगाड्या (bus) चालवून बेस्ट (best) ची खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचं स्पष्टच दिसून येत आहे.  आता तर बेस्टच्या स्वत:च्या बसेसवरही वाहक (Conductor) हे कंत्राटी कर्मचारी म्हणून नेमण्याची तयारी सुरू आहे.  डिसेंबर २०१९ मध्ये निविदा काढण्यात आली होती. दोन दिवसांत ती खुली होणार आहे. यामध्ये ४०० कंत्राटी वाहक नेमले जाणार आहे. याला कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी समितीचे पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दोन ते तीन दिवसांत भेट घेणार आहेत.४०० कंत्राटी वाहक नेमले जाणार आहे. याला कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी समितीचे पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दोन ते तीन दिवसांत भेट घेणार आहेत.


हेही वाचा -

म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा