Advertisement

आता बेस्ट कामगारांचीही बोनसची मागणी

यंदाच्या दिवाळीत बेस्ट कामगारांना पालिकेच्या धर्तीवर १५,५०० रु. बोनस दिला जावा, असेही नमूद केले आहे.

आता बेस्ट कामगारांचीही बोनसची मागणी
SHARES

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा देणाऱ्या बेस्ट कामगारांनी (best workers) दिवाळी बोनसची मागणी केली आहे. काहीच दिवसांपूर्वी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बोनसची मागणी केली होती. सोमवारी त्यांना १५ हजार ५०० बोनसही जाहीर करण्यात आला. परंतु आता, बेस्ट (best) कर्मचाऱ्यांनी ही मागणी केली असून, बेस्ट कामगारांनाही याच धर्तीवर यंदा दिवाळीत बोनस जाहीर करण्याची मागणी बेस्ट वर्कर्स युनियनने केली आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून बेस्टचे कामगार मुंबईकरांसाठी झटत आहेत. ही सेवा बजावताना २ हजारांवर कामगारांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यात ५० कामगारांच्या मृत्यूची नोंद असून बहुतांश कामगार उपचारानंतर बरे होत आहेत. बेस्ट कामगारांनी स्वत:ची जीव धोक्यात घालून सेवा बजाविल्याने कामगारांचे म्हणणे आहे. तेव्हा बोनस देतानाही बेस्ट कामगारांना पालिका (bmc) कर्मचाऱ्यांप्रमाणेच बोनस दिला जावा, अशी मागणी केली आहे.

मुंबई पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस दिला जाताना बेस्ट कामगारांनाही बोनस देण्याची आग्रही मागणी बेस्ट वर्कर्स युनियनचे (best workers union) सरचिटणीस शशांक राव (shashank rao) यांनी केली आहे. त्यासंदर्भात, राव यांनी बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांना पत्र पाठवून बोनसची मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी गतवर्षी बेस्ट कामगारांना दिवाळीनंतर ९,१०० रु. इतका बोनस दिल्याची आठवण करून दिली आहे. यंदाच्या दिवाळीत बेस्ट कामगारांना पालिकेच्या धर्तीवर १५,५०० रु. बोनस दिला जावा, असेही नमूद केले आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा