बेस्टच्या एसी बसेस झाल्या बंद

 Borivali
बेस्टच्या एसी बसेस झाल्या बंद
Borivali, Mumbai  -  


मुंबईतल्या बेस्टच्या एसी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक तापदायी बातमी आहे. बेस्टने 17 एप्रिलपासून एसी बसेस सेवा बंद केली आहे. त्यामुळे मुंबईमधील बेस्टचया 27 आगारांत या एसी बसेस रांगेत उभ्या असल्याचे दिसून येत आहे. मुंबईतल्या बोरीवली (पू.) इथल्या मागाठाणे बस आगारातही एसी बसगाड्या उभ्या असल्याचं दिसून आलं. मिळालेल्या माहितीनुसार या एसी बसेस चीनवरून मागवण्यात आल्या असून एका बसची किंमत 52 लाख रुपये आहे. विशेष म्हणजे इतका पैसा खर्च करून मागवण्यात आलेल्या या एसी बसेसना अखेर भंगारात विकलं जाणार आहे.

Loading Comments