Advertisement

पर्यटकांसाठी भारत गौरव ट्रेन सुरू होणार

भारत गौरव ट्रेन सीएसएमटीहून सुटेल आणि यात आठ स्थानकांचा समावेश असेल.

पर्यटकांसाठी भारत गौरव ट्रेन सुरू होणार
SHARES

मध्य रेल्वे 17 नोव्हेंबर 2023 पासून पर्यटकांसाठी भारत गौरव ट्रेन सुरू होणार आहे. भारत गौरव ट्रेन सीएसएमटीहून सुटेल आणि यात आठ स्थानकांचा समावेश असेल. 

IRCTC द्वारे चालवली जाणारी भारत गौरव टुरिस्ट ट्रेन, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 17 नोव्हेंबर रोजी 04.50 वाजता सुटेल. मुंबई-पुणे-सोलापूर-गुंटकल-रेनिगुंटा-रामेश्वरम-मदुराई-कन्याकुमारी-कोचुवेली सीएसएमटी आणि परतीच्या मार्गाने प्रवास करेल. 25 नोव्हेंबर रोजी 16.15 वाजता पोहचेल.

बोर्डिंग/डिबोर्डिंगसाठी थांबे: ठाणे, कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, कलबुर्गी, रेनिगुंटा ते रामेश्वरम, मदुराई मार्गे मेलपक्कम ते कुडालनगर, कन्याकुमारी, कोचुवेली आणि वरील स्थानकांवरून सीएसएमटीला परत येते.

ही IRCTC टुरिस्ट ट्रेन एक सर्वसमावेशक टूर पॅकेज असेल ज्यामध्ये 3 पर्याय आहेत- इकनॉमी, कमफर्ट आणि डिलक्स. यामध्ये ट्रेनचे भाडे, जेवण, मुक्काम आणि वाहतूक यांचा समावेश आहे.

भारत सरकारच्या कल्पनेनुसार, या थीमवर आधारित ट्रेन्सची संकल्पना भारतातील समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा देशांतर्गत पर्यटकांना तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांना दाखवण्यासाठी आखली आहे.  अधिक माहितीसाठी कृपया https://www.irctctourism.com/ ला भेट द्या.


हेही वाचा

अयोध्येसाठी मुंबईहून विशेष ट्रेन धावणार

अंधेरी-चर्चगेट धिम्या मार्गावर आणखी 15 डब्यांच्या गाड्या धावण्याची शक्यता

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा