Advertisement

भाऊचा धक्का-मांडवा रो- रो बोटसेवा आजपासून सुरू

भाऊचा धक्का ते मांडवा रो-रो बोटसेवा गुरुवारपासून पुन्हा सुरू झाली आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना या बोटसेवेचा लाभ मिळणार आहे.

भाऊचा धक्का-मांडवा रो- रो बोटसेवा आजपासून सुरू
SHARES

भाऊचा धक्का ते मांडवा रो-रो बोटसेवा गुरुवारपासून पुन्हा सुरू झाली आहे. मात्र आता ही बोटसेवा ३० ऑगस्टपर्यंत सुरू असणार आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना या बोटसेवेचा लाभ मिळणार आहे.

भाऊचा धक्का ते मांडवा रो-रो सेवा १५ मार्च रोजी सुरु झाली होती. मात्र, कोरोना लॉकडाऊनमुळं ही सेवा बंद होती. पण, आता रुग्णसंख्या नियंत्रणात येत असल्याचं पाहून सुरु झालेल्या अनलॉकच्या टप्प्यामध्ये रो रो सेवेचाही समावेश झाला आहे. भाऊचा धक्का आणि मांडवा येथून दिवसातून एक वेळ ही सेवा सुरू राहणार आहे.

२० ते ३० ऑगस्ट या कालावधीत भाऊचा धक्का येथून बोट सकाळी सव्वा नऊ ते साडेदहा या वेळेत सुटणार आहे. तर मांडवा येथून बोट दुपारी ४ ते ६ वाजेपर्यंत मुंबईकडे रवाना होणार आहे.

प्रवाशांना अ‌ॅडव्हान्स बुकिंग करायचे असल्यास कंपनीला सोमवार ते शुक्रवार या दिवसांत सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत संपर्क करायचा आहे. अलिबाग ते मुंबई हे अंतर रस्ता मार्गानं ९६ किलोमीटर इतकं आहे. हे अंतर पार करण्यासाठी साधारणपणे ३ ते ३.३० तासाचा कालावधी लागतो. रो रो सेवेमुळे मोठं अंतर वाचणार आहे.हेही वाचा -

मुंबईतील अनेक रुग्णालयं होणार नॉनकोविड

मोडक सागर पाठोपाठ 'ही' तलावं ओव्हरफ्लो होण्याची शक्यता
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा