Advertisement

मुंबई-पुणे ब्ल्यू अँड सिल्व्हर टॅक्सी होणार बंद?


मुंबई-पुणे ब्ल्यू अँड सिल्व्हर टॅक्सी होणार बंद?
SHARES

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी प्रवासी मुंबई-पुणे टॅक्सी ओनर्स असोसिएशनच्या (एमपीटीओए) 'ब्लू अँड सिल्व्हर टॅक्सी'चा वापर करत होते. त्यामुळे प्रवाशांना अगदी सुखकर प्रवास करता येत होता. त्यामुळे या टॅक्सीला मोठ्या प्रमाणात प्रवाशांची मागणी होती. मात्र, आता ही टॅक्सी बंद होण्याच्या मार्गावर आहे. 

सध्याच्या काळात सुरू झालेल्या नव्या ओला, उबर आणि खासगी वाहनांमुळे सध्या या टॅक्सीच्या मागणीत घट होत आहे. परिणामी या टॅक्सीच्या मुंबई-पुणे फेऱ्याही भरपूर कमी झाल्या. त्यामुळं प्रवाशांची अतिशय सोईस्कर 'ब्लू अॅण्ड सिल्व्हर टॅक्सी' येत्या काळात बंद होण्याची शक्यता आहे.


खासगी वाहनांमुळं सेवेवर परिणाम

१९७२ साली मुंबई पुणे टॅक्सी ओनर्स असोसिएशनच्या (एमपीटीओए) 'ब्लू अँड सिल्व्हर टॅक्सी'ला सुरुवात झाली होती. त्यावेळी एकूण ४०० टॅक्सी होत्या. मात्र, आता सुरू झालेल्या ओला आणि उबर या वाहनांमुळे ४०० पैकी काही ३४७ टॅक्सी शिल्लक राहिल्या आहेत. तसंच, काही गाड्यांमध्ये बिघाड झाला असल्यामुळं त्या बंद आहेत. दादर पूर्व येथून पुण्याला जाण्यासाठी या टॅक्सीचं भाडं ४७५ रुपये आहे. मात्र, या ठिकाणी सुरू झालेल्या खासगी वाहनांमुळं या सेवेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतं आहे.


मुंबईसह राज्यभरात सुरू झालेल्या ओला आणि उबर यामुळं मुंबई-पुणे या मार्गावर दिवसातून कमी प्रमाणात या टक्सी जातात. मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी या टॅक्सीचं भाडं ४७५ रुपये आहे. मात्र, खासगी वाहनांचं भाडं ३०० ते ३५० रुपये असल्यानं प्रवासी मुंबई-पुणे प्रवासाठी या वाहनांचा वापर करतात. आम्ही अनेकदा यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्या आहेत.
- केशव पाठक, मुंबई-पुणे टॅक्सी युनीयन मॅनेजर

या सर्व टॅक्सींकडे आवश्यक असलेले सरकारी परमिट आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी काही लोकांनी कर्ज काढून टॅक्सी विकत घेतल्या आहेत. त्यामुळं ही सेवा बंद झाली तर, या लोकांचं मोठ्या प्रमणात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. 'ब्लू अॅण्ड सिल्व्हर टॅक्सी' बंद होऊ नये यासाठी, गेल्यावर्षी एमपीटीओएनं या टॅक्सी संपुर्ण शहरात फिरवण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणं टॅक्सीमध्ये मीटर बसवण्यात आले होते.

या टॅक्सी बंद होण्याच्या मार्गावर आल्या असताना काही टॅक्सी चालक दादर पूर्व स्थानकापासून टाटा रुग्णालयापर्यंत अनधीकृतरित्या टॅक्सी चालवत असल्याचंही पाठक यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा