Advertisement

मुंबईकरांनो, पोहोचण्यापूर्वीच पार्किंगची जागा बुक करा, पालिकेचे नवे अॅप

पालिकेने या प्रकल्पासाठी तब्बल 38 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.

मुंबईकरांनो, पोहोचण्यापूर्वीच पार्किंगची जागा बुक करा, पालिकेचे नवे अॅप
SHARES

मुंबईत (Mumbai News) आता पोहचण्याआधीच आपली पार्किंग जागा (Parking Space), स्लॉट बुक करता येणार आहे. प्रस्तावित मुंबई पार्किंग प्राधिकरणाची मुंबई पार्किंग इंटरफेस प्रणाली लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 38 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.

पालिकेनं (BMC) एकात्मिक माहिती तंत्रज्ञान प्रणालीच्या माध्यमातून रस्त्यासह (ऑन स्ट्रीट), रस्त्यालगतच्या (ऑफ स्ट्रीट) तसेच इतर ठिकाणच्या पार्किंगशी संबंधित माहितीचे सर्वंकष डिजिटलायजेशन करण्याच्या उद्दिष्टानं मुंबई पार्किंग पूल (एमपीपी) तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये विद्यमान तसेच प्रस्तावित अशा पार्किंगशी संबंधित प्रकल्पांची शासकीय, व्यावसायिक आणि खासगी संस्थांच्या पार्किंगची संबंधित माहिती एकत्रित केली जाणार आहे.

महत्वाचे म्हणजे, या एकाच डेटाबेसमधून संबंधित सर्व भागधारकांना पार्किंगच्या डेटाबेसचा वापर करणं सुलभ होणार आहे.

मुंबईतील पार्किंग व्यवस्थापनासाठी प्रस्तावित सदर माहिती तंत्रज्ञान प्रणालीतून बृहन्मुंबई महानगरपालिका विविध उपाययोजना करण्याचा प्रयत्न करणार आहे. पार्किंग संचलन, उपलब्ध पार्किंग जागांचा पुरेपूर वापर करण्यासह एकूणच रस्त्यांवरील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. 

बृहन्मुंबई महानगरपालिका आणि इतर शासकीय संस्था म्हणजे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पोर्ट ट्रस्ट, रस्त्यालगतची (रोडसाईड) पार्किंग आणि खासगी गृहनिर्माण संस्थांमध्ये पार्किंगसाठी उपलब्ध असलेल्या जागा अशी सर्वच माहिती एकाच सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध होणार असल्यानं ही खूप मोठी बाब ठरणार आहे. सॉफ्टवेअर इंटरफेसमुळे या सर्व पार्किंगच्या सुविधेशी संबंधित बाबी एकत्रित करणं शक्य होईल. 



हेही वाचा

आता पावसात मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर पाणी नाही साचणार

मरीन ड्राईव्हवर व्ह्यूइंग डेक बांधण्यात येणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा