Advertisement

मुंबई विमानतळावर मराठीत फलक लागणार, विमानतळ प्राधिकरणाची माहिती

याचिकाकर्त्याने केंद्रीय गृहमंत्रालयाच्या दोन अधिसूचनांचे अनुपालन व्हावे अशी मागणी या याचिकेद्वारे केली होती.

मुंबई विमानतळावर मराठीत फलक लागणार, विमानतळ प्राधिकरणाची माहिती
SHARES

मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर नोव्हेंबर २०२४ पर्यंत सर्वत्र मराठी नाम फलक लावण्याचे काम पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (एमआयएएल) कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाला दिले.

मुंबई उच्च न्यायालयात गुजराती विचार मंच संस्थेने एक जनहित याचिका दाखल केली होती. त्या याचिकेची सुनावणी प्रभारी मुख्य न्यायाधीश नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर झाली. या याचिकेत विमानतळावर केवळ इंग्रजी ऐवजी देवानागरी लिपित फलक आणि सार्इनबोर्ड द्यावेत अशी विनंती करण्यात आली होती. 

जानेवारी महिन्यात उच्च न्यायलयाने याचिकाकर्त्याला त्याचे याचिकेबाबतचा प्रामाणिकपणा म्हणून एक लाख रुपये ठेव जमा करण्यास सांगितले होते. त्यानुसार संस्थेने एक लाख रुपये न्यायालयाकडे जमा केले. त्यानंतर बुधवारी त्यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली.

सुनावणी दरम्यान विमानतळाच्या वकिलांनी हिंदी, इंग्रजी प्रमाणे मराठीत देखील फलक लावण्यात येतील अशी माहिती दिली. नोव्हेंबर २०२४ पर्यंत हे काम पूर्ण होर्इल असे या वकिलाने न्यायालयाला आश्वस्त केले आहे.

याचिकाकर्त्याने केंद्रीय गृहमंत्रालयाच्या दोन अधिसूचनांचे अनुपालन व्हावे अशी मागणी या याचिकेद्वारे केली होती. या अधिसूचनांमध्ये हिंदी आणि क्षेत्रीय भाषांच्या वापराबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र वारंवार पाठपुरावा करुनही विमानतळ प्रशासनाने या अधिसूचनांचे अनुपालन केले नसल्याचे याचिकेत अधोरेखित करण्यात आले आहे.



हेही वाचा

पोलिस व्हॅन आणि बेस्ट बसमध्ये धडक, नियंत्रण सुटल्याने अपघात

गुड न्यूज! नवी मुंबई विमानतळ 2024 मध्ये सुरू होईल : देवेंद्र फडणवीस

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा