Advertisement

धक्कादायक! धावत्या एक्स्प्रेसचा डबा झाला वेगळा

वांद्रे टर्मिनस-रामनगर एक्स्प्रेसचा एक डबा गुरुवारी सकाळी जोगेश्वरी स्थानकाजवळ रेल्वेपासून वेगळा झाला.

धक्कादायक! धावत्या एक्स्प्रेसचा डबा झाला वेगळा
SHARES

वांद्रे टर्मिनस-रामनगर एक्स्प्रेसचा एक डबा गुरुवारी सकाळी जोगेश्वरी स्थानकाजवळ रेल्वेपासून वेगळा झाला. ज्यामुळे पश्चिम मार्गावर लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या कामकाजात खोळंबा झाला.

या कालावधीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. परंतु यामुळे वांद्रे टर्मिनस-रामनगर एक्स्प्रेसचा पुढील प्रवास उशीरा सुरू झाला. याशिवाय लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाली. यामुळे पश्चिम रेल्वेच्या उपनगरी नेटवर्कवरील शेकडो प्रवाशांची गैरसोय झाली.

रेल्वेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, शेवटची एलएचबी ट्रेन अंधेरी आणि जोगेश्वरी स्थानकांवरून पहाटे ५.३० वाजता वेगळी झाली. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर म्हणाले की, रेल्वेचा शेवटचा डबा रिक्त होता आणि तो आगामी स्थानकातून उघडला जाणार होता. ते जोगेश्वरी स्थानकाजवळ वेगळे झाले.

ते म्हणाले की यानंतर डबे पुन्हा ट्रेनला जोडले गेले आणि सकाळी ६.४० वाजता ट्रेननं पुढचा प्रवास सुरू केला. ठाकूर म्हणाले की, या काळात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही.

दुसर्‍या रेल्वे अधिकाऱ्यानं सांगितलं की, यापूर्वी ही गाडी वांद्रे टर्मिनसहून उत्तर प्रदेशमधील रामनगरसाठी सकाळी ५.१० वाजता सुटली होती. ती सकाळी ५.५५ वाजता बोरिवलीला पोहचणार होती. परंतु घटनेमुळे ती पहाटे ७.०३ ला पोहोचली. या घटनेमुळे पश्चिम मार्गावरील उपनगरी गाड्या १० ते १५ मिनिटं उशिरानं धावत होत्या.



हेही वाचा

भंगार विकून मध्य रेल्वेची २२५ कोटी रुपयांची कमाई

ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भात महत्त्वाचा निर्णय

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा