बोरिवली रेल्वे स्थानकात सुरक्षा अभियान

 Borivali
बोरिवली रेल्वे स्थानकात सुरक्षा अभियान
बोरिवली रेल्वे स्थानकात सुरक्षा अभियान
See all

बोरिवली - रेल्वे पोलीस ठाणे अंतर्गत लोहमार्ग पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार रेल्वे प्रवासी सुरक्षा सप्ताह 28 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या दरम्यान आयोजित करण्यात आलंय. याचप्रमाणे उपनगरातील बोरिवली रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा बलासह विशेष मोहीमेचं आयोजन करण्यात आलं. त्याकरता बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यातील 16 पोलीस कर्मचारी, 6 महिला पोलीस कर्मचारी तसंच बोरिवली रेल्वे सुरक्ष बलाचे उप निरीक्षक मिना सिंग, 15 कर्मचारी, 3 महिला कर्मचारी हजर होते. दरम्यान प्रवाशांना सुरक्षा विषयक सूचना देऊन बी सेफ पत्रकं आणि महिला सुरक्षा विषयक पत्रकं वाटण्यात आली. त्याचप्रमाणे रेल्वे अपघात कमी करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीही केली.

Loading Comments