Advertisement

वाहतुकीचे नियम न पाळल्यास परवाना कायमस्वरुपी रद्द होणार

गेल्या ३ महिन्यांत वाहतूक पोलिसांनी १ हजार २४७ जणांचे वाहतूक परवाने रद्द केले आहेत.

वाहतुकीचे नियम न पाळल्यास परवाना कायमस्वरुपी रद्द होणार
SHARES

वाहतुकीच्या नियमांच पालन न केल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं वारंवार वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात येतं. मात्र, तरीही मुंबईतील बेदकारपणे वाहन चालविण्यात येतात. त्यामुळं अशा चालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी चालकांचे वाहतूक परवाने रद्द केले आहेत. गेल्या ३ महिन्यांत वाहतूक पोलिसांनी १ हजार २४७ जणांचे वाहतूक परवाने रद्द केले आहेत.

बेदरकारपणं वाहन चालवल्यानं आणि सिग्नल तोडल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षी मुंबईत २ हजार ८१४ रस्ते अपघात झाले होते. त्यात ४०३ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, ऑक्टोबर २०१९ मध्ये मुंबईतल्या वाहतूक पोलिसांनी आरटीओला एक प्रस्ताव दिला होता. त्यानंतर वाहन चालकांचं परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात आली. तत्पूर्वी महाराष्ट्र पोलिसांनी एक सूचना जारी केली होती.

एखादी व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्यास, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करत असल्यास, सिग्नल तोडत असल्यास त्याचा परवाना किमान ३ महिन्यांसाठी रद्द करण्यात यावा, असं महाराष्ट्र पोलिसांनी सूचनेत म्हटलं होतं. वाहन परवाना ३ महिन्यांसाठी रद्द करण्यात आल्याची कारवाई झाल्यानंतरही बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या व्यक्तीचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला जाऊ शकतो.

ऑक्टोबर २०१९ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत राज्य वाहतूक विभागानं राज्यभरातल्या एकूण १० हजार ३५१ चालकांचे परवाने रद्द केल्याची माहिती मिळते. या १० हजार ३५१ चालकांमध्ये मुंबईतल्या १ हजार २४७ जणांचा समावेश आहे. यामधील ४३० जणांचा परवाना वाहन चालवताना मोबाईलवर वापरल्यानं रद्द करण्यात आला आहे. तसंच, ५२० जणांवर मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्यानं कारवाई झाली आहे.

राज्यभरात १४ हजार ३५२ जणांचा परवाना वाहन चालवताना मोबाईलवर बोलत असल्यानं रद्द करण्यात आला असून ४ हजार ७४७ जणांचे परवाने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्यानं रद्द करण्यात आले आहेत.



हेही वाचा -

वाडिया रुग्णालय बंद होण्याच्या मार्गावर

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेना-मनसेचे शक्ती प्रदर्शन



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा