Advertisement

सायन-पनवेल महामार्गावर बसला मोठा अपघात; अनेक प्रवासी जखमी

सायन-पनवेल महामार्गावर एका बसल मोठा अपघात झाला आहे.

सायन-पनवेल महामार्गावर बसला मोठा अपघात; अनेक प्रवासी जखमी
SHARES

सायन-पनवेल महामार्गावर एका बसल मोठा अपघात झाला आहे. या महामार्गावरील तळोजा लिंक रोड जवळ असलेल्या भुयारी मार्गाच्या शेडला बसनं जोरदार धडक दिली. या अपघातात मोठ्या प्रमाणात प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारी सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास हि घटना घडली आहे.

या घटनेत वाहन चालक गंभीर जखमी झाले असून, १० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये गरोदर महिलांचा देखील समावेश आहे. जखमींना एमजीएम रुग्णालय कामोठे इथं दाखल करण्यात आलं आहे. अपघात अतिशय भीषण असून वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाला असल्याचं बोललं जात आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा बोगद्याजवळ मुंबईकडे दुधाची वाहतूक करणारा भरधाव टँकर पलटल्यानं अपघात झाला. अपघातादरम्यान टँकरची गती जास्त होती. त्यामुळं हा टँकर जवळपास ५० फूट फरपटत पुढे गेला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. या टँकरची इतर कुठल्याही वाहनाला धडक लागली नसल्यानं महामार्गावरील मोठी दुर्घटना टळली आहे. टँकरमध्ये अडकलेला मृतदेह चालक किंवा क्लिनरचा आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा