Advertisement

महिला रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व महिला डब्यांत सीसीटीव्ही

मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना अनेकदा हल्ले, छेडछाड, विनयभंगाच्या घटनांना समोरं जावं लागतं.

महिला रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व महिला डब्यांत सीसीटीव्ही
SHARES

मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना अनेकदा हल्ले, छेडछाड, विनयभंगाच्या घटनांना समोरं जावं लागतं. अशा घटना रेल्वे मार्गावर घडत असल्यानं महिलांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. त्यामुळं या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आता रेल्वे प्रशासनानं महिला प्रवाशांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, महिला डब्यात सीसीटीव्ही बसविण्या येणार आहे.

लोकलच्या महिल्यांच्या डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं काम जानेवारी २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मिळते. कोरोनाकाळात या कामाची गती मंदावली होती. मात्र, आता या कामाला वेगानं पार पाडण्यात येत आहे.

लोकल प्रवासादरम्यान महिलांवर हल्ले, छेडछाड, विनयभंगाच्या घटना घडत असल्यानं त्यांच्या सुरक्षेसाठी लोकलमधील महिला डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय झाला होता. प्रथम पश्चिम रेल्वेनं २०१५ मध्ये महिला डब्यात कॅमेरे बसवण्यास सुरुवात केली. त्यानंतर मध्य रेल्वेनेही हा प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली.

एका १२ डबा लोकलमध्ये महिलांसाठी द्वितीय श्रेणीचे ३ डबे व प्रथम श्रेणीचा डबा असतो. यातील प्रत्येक डब्यात १ ते २ कॅमेरे बसवण्याचे नियोजन करण्यात आलं.

मध्य रेल्वेवरील लोकलच्या डब्यात एकूण ७४४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचं नियोजन आहे. यातील १५५ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे काम मार्च २०२० पासून काही महिन्यांपुरता बंद होते. निर्बंध शिथिल होताच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. 

आणखी ५८९ सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचं काम जानेवारी २०२२च्या अखेपर्यंत पूर्ण होईल. सध्या महिला डब्यात २०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू असल्याची माहिती सुरक्षा दलाने दिली.

मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर १९९० साली ६९ लोकल गाड्या होत्या आणि दिवसाला १,०२३ लोकल फेऱ्या होत होत्या. २०१० मध्ये लोकल गाड्यांची संख्या १११ झाली आणि फेऱ्या १,४६२ झाल्या. तर २०१८ पासून ताफ्यात १३४ लोकल गाड्या असून दिवसाला १,७७४ फेऱ्या होऊ लागल्या.

साधारण १० ते १२ वर्षांपूर्वी दिवसाला ३२ ते ३४ लाख असलेली प्रवासी संख्या मार्च २०२० पूर्वी ४२ ते ४३ लाखांपर्यंत गेली होती. त्यात महिला प्रवाशांची संख्याही लक्षणीय आहे. करोनामुळे कमी झालेली प्रवासी संख्या पुन्हा वाढू लागली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा