रेल्वेच्या मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, पश्चिम मार्गावर जम्बोब्लॉक

 Mumbai
रेल्वेच्या मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, पश्चिम मार्गावर जम्बोब्लॉक
Mumbai  -  

रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणा आणि देखभालीच्या अभियांत्रिकी कामानिमित्ताने रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तर पश्चिम मार्गावर जम्बोब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉकदरम्यान ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यानची डाऊन जलद मार्गावरील वाहतूक डाऊन धिम्या मार्गावरून चालवली जाईल. सीएसटी स्थानकावर येणाऱ्या आणि तिथून सुटणाऱ्या धिम्या मार्गावरील सर्व लोकल सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटे उशिरा धावतील.

हार्बर रेल्वेच्या कुर्ला ते वाशी या अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.20 ते संध्याकाळी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. यादरम्यान सीएसटी ते पनवेल, बेलापूर, वाशी मार्गावर सकाळी 10.20 ते दुपारी 3.48 पर्यंत आणि पनवेल, बेलापूर, वाशी ते सीएसटी मार्गावरील रेल्वे वाहतूक सेवा बंद राहील. ब्लॉकदरम्यान सीएसटी-कुर्ला आणि वाशी-पनवेल या मार्गावर विशेष गाड्या चालवण्यात येतील.

पश्चिम रेल्वेच्या बोरीवली ते नायगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळ 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जम्बो ब्लॉक असणार आहे. ब्लॉकदरम्यान अप मार्गावरील सर्व गाड्या विरार, वसई रोड ते बोरीवलीपर्यंत अप जलद मार्गावरून चालवल्या जातील. डाऊन मार्गावरील गोरेगाव ते वसई रोड, विरार स्थानकादरम्यान डाऊन जदल मार्गावर चालवण्यात येतील. तसेच ब्लॉक दरम्यान भाईंदरसाठी कोणतीही रेल्वे सेवा चालवण्यात येणार नाही.

Loading Comments