Advertisement

मध्य रेल्वे विस्कळीत, चाकरमान्यांचे हाल


मध्य रेल्वे विस्कळीत, चाकरमान्यांचे हाल
SHARES

कल्याण रेल्वे स्थानकावर झालेल्या तांत्रिक बिघाडीचा फटका  गुरूवारी सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांना सहन करावा लागला. तांत्रिक बिघाडीमुळे मध्यरेल्वेची अप आणि डाऊन वाहतूक २० मिनिटं ठप्प झाली होती. त्यामुळे  कल्याणहून मुंबईकडे येणाऱ्या लोकल १५ ते२० मिनिटं उशिरानं धावत होत्या. लोकल विस्कळीत झाल्यामुळे स्थानकावर ही मोठी गर्दी पहायला मिळत होती. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होण्याचं नेमके कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. 

ऐन गर्दीच्या वेळी मुंबईच्या दिशेने येणारी मध्य रेल्वेची वाहतूक कल्याण ते डोंबिवलीदरम्यान विस्कळीत झाल्यानं चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. लोकलसेवा विस्कळीत झाल्यानं कल्याण आणि डोंबिवली स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळली आहे. रेल्वेच्या पायाभूत सुविधांवर लक्ष द्यायाला कुणालाच वेळ नसल्यानं आजही तांत्रिक बिघाड होतात, असं म्हणत प्रवाशांनी आपला संताप व्यक्त केला.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा