Advertisement

Central railway: प्रवाशांच्या सेवेसाठी लोकल फेऱ्यांमध्ये वाढ

प्रवाशांना धक्काबुक्की सहन करत प्रवास करावा लागतो. त्यामुळं या त्रासापासून प्रवाशांची सुटका व्हावी यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Central railway: प्रवाशांच्या सेवेसाठी लोकल फेऱ्यांमध्ये वाढ
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईची लाइफलाइन लोकल वाहतूक प्रवाशांसाठी बंद करण्यात आली. मात्र, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी जून महिन्यापासून लोकल सेवा सुरू करण्यात आली. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू केली असली तरी प्रवासावेळी सामाजिक अंतराच्या नियमांचं उल्लंघन होतं. त्याशिवाय प्रवाशांना धक्काबुक्की सहन करत प्रवास करावा लागतो. त्यामुळं या त्रासापासून प्रवाशांची सुटका व्हावी यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेच्या निर्णयानुसार ६८ लोकल सेवेची वाढ करण्यात आली आहे. सध्यस्थितीत मध्य रेल्वेमार्गावर ३५५ उपनगरीय सेवा चालविल्या जात असून, यामध्ये ६८ फेऱ्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळं मध्य रेल्वे मार्गावर दररोज एकूण ४२३ लोकल फेऱ्या चालविल्या जाणार आहेत.

अतिरिक्त ६८ लोकल सेवा

  • कसारा स्थानकातून ९ लोकल सुटणार असून, ५ अप व ४ डाउन मार्गावर धावणार आहेत.
  • कसारा-कल्याण स्थानकातून ६ लोकल सुटणार असून, ३ डाउन व ३ अप मार्गावर धावणार आहेत.
  • कर्जत स्थानकातून ९ लोकल सुटणार असून, ४ डाउन व ५ अप मार्गावर धावणार आहेत.
  • ठाणे-कर्जत स्थानकातून २ लोकल सुटणार असून, १ डाउन व १ अप मार्गावर धावणार आहे.
  • कल्याण-कर्जत स्थानकातून २ लोकल सुटणार असून, १ डाउन व १ अप मार्गावर धावणार आहे.
  • अंबरनाथ स्थानकातून ३ लोकल सुटणार असून, २ डाउन व १ अप मार्गावर धावणार आहेत.
  • कल्याण स्थानकातून ५ लोकल सुटणार असून, २ डाउन व ३ अप मार्गावर धावणार आहेत.
  • ठाणे स्थानकातून ४ लोकल सुटणार असून, २ डाउन व २ अप मार्गावर धावणार आहेत.
  • कुर्ला स्थानकातून ६ लोकल सुटणार असून, ३ डाउन व ३ अप मार्गावर धावणार आहेत.

हार्बर मार्ग

  • पनवेल स्थानकातून १४ लोकल सुटणार असून, ८ डाउन व ६ अप मार्गावर धावणार आहेत.
  • वाशी स्थानकातून ८ लोकल सुटणार असून, ३ डाउन व ५ अप मार्गावर धावणार आहेत.

एकूण ४२३ लोकल सेवा

  • ठाणे स्थानकातून ७२ लोकल सुटणार असून, ३७ डाउन व ३५ अप मार्गावर धावणार आहेत.
  • डोंबिवली स्थानकातून २४ लोकल सुटणार असून, ११ डाउन व १३ अप मार्गावर धावणार आहेत.
  • कुर्ला स्थानकातून १४ लोकल सुटणार असून, ७ डाउन व ७ अप मार्गावर धावणार आहेत.
  • कल्याण स्थानकातून ८२ लोकल सुटणार असून, ४१ डाउन व ४१ अप मार्गावर धावणार आहेत.
  • टिटवाळा स्थानकातून २० लोकल सुटणार असून, १० डाउन व १० अप मार्गावर धावणार आहेत.
  • कसारा स्थानकातून ४१ लोकल सुटणार असून, २१ डाउन व २० अप मार्गावर धावणार आहेत.
  • कर्जत स्थानकातून ४५ लोकल सुटणार असून, २२ डाउन व २३ अप मार्गावर धावणार आहेत.
  • बदलापूर स्थानकातून २४ लोकल सुटणार असून, १२ डाउन व १२ अप मार्गावर धावणार आहेत.
  • अंबरनाथ स्थानकातून ९ लोकल सुटणार असून, ४ डाउन व ३ अप मार्गावर धावणार आहेत.

हार्बर मार्ग 

  • पनवेल स्थानकातून ८४ लोकल सुटणार असून, ४३ डाउन व ४१ अप मार्गावर धावणार आहेत.
  • वाशी स्थानकातून ८ लोकल सुटणार असून, ३ डाउन व ५ अप मार्गावर धावणार आहेत.
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा